BKC Traffic Diversions: सायन रेल्वे स्थानकावरील पूल पाडणार असल्याने बीकेसीतील वाहतूक वळवली; हे आहेत पर्यायी मार्ग, वाचा-bkc traffic diversions advisory sion railway station bridge demolition ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BKC Traffic Diversions: सायन रेल्वे स्थानकावरील पूल पाडणार असल्याने बीकेसीतील वाहतूक वळवली; हे आहेत पर्यायी मार्ग, वाचा

BKC Traffic Diversions: सायन रेल्वे स्थानकावरील पूल पाडणार असल्याने बीकेसीतील वाहतूक वळवली; हे आहेत पर्यायी मार्ग, वाचा

Aug 08, 2024 02:16 PM IST

BKC Traffic Diversions news: मध्य रेल्वे सायन ब्रिज पाडणार आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बीकेसीत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

 सायन रेल्वे स्थानकावरील पूल पाडल्यामुळे बीकेसीतील वाहतूक वळवली; हे आहेत पर्यायी मार्ग, वाचा
सायन रेल्वे स्थानकावरील पूल पाडल्यामुळे बीकेसीतील वाहतूक वळवली; हे आहेत पर्यायी मार्ग, वाचा

BKC Traffic Diversions news: वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी व शीव या महत्वाच्या मार्गांना जोडणाऱ्या, सायन स्थानकावरील अत्यंत महत्वाचा उड्डाणपुल असलेल्या सायन रेल्वे पूलावरून अवजड वाहनांना प्रवासास बंदी घालण्यात आली आहे. येथील वाहतूक ही बीकेसी मार्गाने वळवण्यात आली होती. मात्र, येथे होणारी वाहतूक कोंडी पाहता आज ८ ऑगस्टपासून बीकेसीतील वाहतूक ही तात्पूरत्या स्वरुपात इतरत्र वळवली आहे. नागरिकांनी याची दखल घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करा असे आवाहन करण्यात आले आहे.

सायन पूर्व-पश्चिम जोडणारा सायन ओव्हर ब्रिज हा मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून थोकादायक घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे या पूलावरून अवजड वाहने व २.८० मिटर उंचीच्या वरील वाहनांना बंदी घालण्याबाबत प्रस्थाव रेल्वे प्राधिकरणाने दिला होता. त्यानुसार या मार्गावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. तसेच येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. मात्र, बीकेसी येथे देखील वाहतूक कोंडी होत असल्याने ही कोंडी सोडवण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी या परिसरातील वाहतूक आज ८ ऑगस्ट पासून तात्पूरत्या स्वरुपात वळवली आहे. या वाहतूक बदलाबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी परिपत्रक जारी केली असून ते एक्सवर पोस्ट देखील केले आहे.

वाहतूक मार्गातील प्रमूख बदल

पूलावरील वाहतूक बंद: सायन रोड ओव्हर ब्रिज (आरओबी), ११२ वर्षांहून जुना, १ ऑगस्ट २०२४ पासून वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर येथील वाहतूक बदलाचे आदेश आज पासून देण्यात आले आहेत.

या मार्गावर नो एंट्री

मार्ग १:

एमएमआरडीए कार्यालयाकडून जिओ वर्ल्डकडे येणारी वाहनांची वाहतूक स्ट्रीट १ फॅमिली कोर्ट जंक्शन येथे उजवीकडील वळणाने बीकेसी रोडने एनएसइ जंक्शन, भारत नगर आणि बीकेसी मार्गे वळवण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग: एमएमआरडीए कार्यालयाकडून जिओ वर्ल्डकडे जाणारी वाहतूक फॅमिली कोर्ट जंक्शनवर डावीकडे वळवण्यात आली आहे. तर बीकेसी रोडने एनएसई जंक्शन, भारत नगर आणि बीकेसीकडे जाण्यासाठी एमएमआरडीए जंक्शन येथे यू टर्न घेता येणार आहे.

मार्ग २

नो एंट्री : तर बीकेसी कनेक्टरकडून अल-कुरैश रस्त्याने एनएसई जंक्शनकडे येणारी सर्व वाहने टाटा कॉलनी रस्त्याने वळवण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग: बीकेसी कनेक्टरवरून अल-कुरैश रस्त्याने होणारी वाहतूक एनएसई जंक्शन - भारत नगर जंक्शन येथे उजवीकडे वळवण्यात आली आहे. तर नाबार्ड जंक्शन येथे डावीकडे ही वाहतूक वळवली आहे. भरत नगर रस्त्याने वाल्मिकी नगरकडे त्यांच्या इच्छित स्थळी जाईल.

मार्ग ३:

नो एंट्री: कनेक्टर ब्रिज आणि एनएसई जंक्शन वरून येणारी वाहनांची वाहतूक हॉटेल यौतचा समोरील स्ट्रीट-३ रस्त्यावरील लतिका रोडसाठी वन बीकेसी येथे डावीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग: कनेक्टर ब्रिज आणि एनएसई जंक्शनवरून वाहतूक एक बीकेसी येथे उजवे वळण घेईल व कॅनरा बँक जंक्शनवर डावीकडे वळण घेऊन एव्हेन्यू ३ वरून जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर व अमेरिकन कॉन्सुलेट जंक्शनकडे कसडून बीकेसी कडे जाईल.

मार्ग-४:

नो एंट्री: जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, अमेरिकन कॉन्सुलेट, परिनि क्रिसेन्जो, कौटिल्य भावा मार्गे स्ट्रीट-३ आणि ॲव्हेन्यू-१ रोडने एनएसई जंक्शनकडे येणारी वाहने ही कौटुंबिक न्यायालय सोमवार ते शुक्रवार ओएनजीसी बिल्डिंग पर्यंत प्रतिबंधित असेल. शनिवार-रविवारी मात्र, हा निर्बंध वगळण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग:

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, अमेरिकन कॉन्सुलेट येथून वाहतूक ओएनजीसी बिल्डिंग येथे यू-टर्न घेईल, एव्हेन्यू ३ रोडने जाईल आणि अमेरिकन कॉन्सुलेट येथे डावीकडे वळण घेईल, अंबानी स्क्वेअर बिल्डिंगमार्गे त्यांच्या निर्धारित ठिकाणी जाईल. परिनी क्रिसेन्जो, कौटिल्य भवन येथून एव्हेन्यू १ रस्त्याने जाणारी वाहतूक ओएनजीसी बिल्डिंगकडे उजवे वळण घेईल व एव्हेन्यू ३ रस्त्याने पुढे जाईल. तसेच अमेरिकन वाणिज्य दूतावासाकडे डावीकडे वळण घेऊन अंबानी स्क्वेअर इमारतीमार्गे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचेल.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स रस्त्यावरून बीकेसी भागाकडे येणाऱ्या प्रवासी बसे या एनएसई जंक्शन, भारत नगर जंक्शन, नाबार्ड जंक्शन आणि डायमंड जंक्शन येथे वळणार नाहीत. या बस प्लॅटिना जंक्शन येथे उजवे वळण घेऊन बीकेसी परिसरात त्यांच्या इच्छित स्थळी जातील.

विभाग