मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवाजी पार्क ठाकरेंकडे गेल्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; “BKC 'मातोश्री'च्या अधिक जवळ..”

शिवाजी पार्क ठाकरेंकडे गेल्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; “BKC 'मातोश्री'च्या अधिक जवळ..”

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 23, 2022 06:26 PM IST

कोर्टाचा निर्णय आम्ही मान्य करतो. काही काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही आमची तयारी करतो, ते त्यांची तयारी करतील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाते प्रतोदभरत गोगावले यांनी दिली आहे.

शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे गटाच्या विरोधातील पहिली कायदेशीर लढाई जिंकली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं शिवसेनेला दिली आहे. मैदानावर मेळाव्याची परवानगी नाकारण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. त्यामुळं एक नेता, एक मैदान ही शिवसेनेची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी  परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यामध्ये ठाकरे गट, शिंदे गट आणि पालिकेच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. या युक्तीवादानंतर न्यायालयाने ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी देण्यात आली आहे.

यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आली की,कोर्टाचा निर्णय आम्ही मान्य करतो. काही काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही आमची तयारी करतो, ते त्यांची तयारी करतील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाते प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे. तसेच आम्हाला वाद-विवाद करायचे नाहीय. आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचे विचार मांडायचे आहेत, असंही भरत गोगावले यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरेंच्या भाषणाची वेळ एकच?

आम्ही शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली होती. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची आम्हाला परवानगी दिली असती, तर आम्हीतेथे मेळावा घेतला असता मात्र आता आम्ही बीकेसीच्या  मौदानात दसरा मेळावा साजरा करु, बीकेसीदेखील बाळासाहेबांच्या मातोश्रीजवळच आहे, असं गोगावले यांनी म्हटलं आहे.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षप्रमुख यांच्या भाषणाची वेळ एकच असेल का, यावर यावर चर्चा करून वेळ ठरवली जाईल, असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या