मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : दुसरा कोणी असता तर हार्टअटॅकने गेला असता, एकनाथ शिंदेंनी सांगितला 'तो' प्रसंग

Eknath Shinde : दुसरा कोणी असता तर हार्टअटॅकने गेला असता, एकनाथ शिंदेंनी सांगितला 'तो' प्रसंग

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 05, 2022 10:10 PM IST

BKC Dasara Melava : आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी अस्तित्वात येत असताना मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेचाही किस्सा सांगितला.

एकनाथ शिंदेंनी सांगितला'तो' प्रसंग
एकनाथ शिंदेंनी सांगितला'तो' प्रसंग

BKC Dasara Melava : मुंबईतील बीकेसी येथील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावरील उद्धव ठाकरेंचे भाषण झाल्यानंतर भाषण केलं आणि उद्धव ठाकरेंच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांनातुम्ही बाजारात विकायला काढलेआणि आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता. मग तुम्हाला बापाचे विचार विकणारी टोळी म्हणायचं का? असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदे म्हणाले की,आमदार-खासदारांबरोबर जनतेला आम्हाला का समर्थन मिळत आहे, याचे आत्मपरिक्षण उद्धव ठाकरेंनी करायला हवं.

आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी अस्तित्वात येत असताना मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेचाही किस्सा सांगितला.

शरद पवारांनी उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागेल असं तुम्हाला सांगितलं. तुम्ही मला तेच सांगितलं. याच इथल्या सोफीटेल हॉटेलमध्ये मला बोललात की पवार साहेब मला मुख्यमंत्री व्हावं असं सांगत आहेत. त्यावेळी माझ्या जागी दुसरा कुणी असता तर तो हार्टअटॅकनं गेला असता. पण या एकनाथ शिंदेला पदाची लालसा नाही. मी तुम्हाला हो मग काय अडचण आहे असं क्षणार्धात म्हटलं होतं. मला कुठे मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला कुठे ते जमणार आहे असे म्हटल्याचे ते म्हणाले.

शिंदे म्हणाले की, देशातल्या १४ राज्यातील प्रमुखांनी मला दिल्लीत येऊन पाठिंबा दिला. इतके आमदार, खासदार, आणि लाखो शिवसैनिकांनी पाठिंबा दिला आम्हाला.  तुम्हाला त्यांनी का सोडलं, राज ठाकरे, नारायण राणे असे किती लोक गेले. येथे निहार, स्मिता ठाकरे बसले आहेत. मग कोण चुकीचं, हे सगळे चुकीचे आणि तुम्ही बरोबर? तुम्ही सांगायचं आणि ऐकायचं असं कधी केलं नाही, एकनाथ शिंदेने स्पष्ट आणि शिवसेनेच्या फायद्याचं आणि राज्याच्या हिताचं सांगितलं

कोरोना काळात तुम्ही वर्क फ्रॉम होम केलं. पण आम्ही वर्क विदआऊट होमवाले आहोत. एकनाथ शिंदे जागोजागी जाऊन सर्वांची विचारपूस करत होता. रुग्णालयातील अडचणी सोडवत होता. महालक्ष्मी एक्स्प्रेस पुराच्या पाण्यात अडकली होती. प्रवासी खाली उतरायला मागत नव्हते. किती पाणी खोल याची भीती सर्वांना होती. पण मी अजिबात पर्वा न करता पाण्यात उतरलो. एक गर्भवती महिला तिथं अडकली होती. तिथं डॉक्टरांना घेऊन गेलो, डॉक्टरांना म्हणालो मी बुडेन पण तुम्हाला बुडू देणार नाही, अजून काय करायचं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या