एका पॉर्नस्टारला पुढं करून भाजप आमच्यावर आरोप करतो, मग त्याच्या घोटाळ्यांचाही हिशेब द्या - संजय राऊत-bjp using pornstar to defame opposition leaders alleges sanjay raut ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एका पॉर्नस्टारला पुढं करून भाजप आमच्यावर आरोप करतो, मग त्याच्या घोटाळ्यांचाही हिशेब द्या - संजय राऊत

एका पॉर्नस्टारला पुढं करून भाजप आमच्यावर आरोप करतो, मग त्याच्या घोटाळ्यांचाही हिशेब द्या - संजय राऊत

Sep 27, 2024 05:42 PM IST

Sanjay Raut : मेधा सोमय्या यांच्या मानहानीच्या खटल्याबाबत बोलताना खासदार संजय राऊत यांनी आज भाजपवर सडकून टीका केली.

एका पॉर्नस्टारला पुढं करून भाजप आमच्यावर आरोप करतो, मग त्याच्या घोटाळ्यांचाही हिशेब द्या - संजय राऊत
एका पॉर्नस्टारला पुढं करून भाजप आमच्यावर आरोप करतो, मग त्याच्या घोटाळ्यांचाही हिशेब द्या - संजय राऊत (PTI)

मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात जामीन मिळालेल्या संजय राऊत यांनी आज या मुद्द्यावर बोलताना भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. ‘भारतीय जनता पक्ष एका पॉर्नस्टारला पुढं करून आमच्यावर आरोप करतो. यावरून त्यांची लायकी कळते,' असं राऊत यांनी सुनावलं. 

ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मेधा सोमय्या यांच्या मानहानीवर भाष्य करताना संजय राऊत यांनी अत्यंत जळजळीत शब्दांत प्रतिक्रिया दिली. ‘खालच्या कोर्टापासून वरच्या कोर्टापर्यंत मी एक सिनेमा काढणार आहे. ’बाई मी विकत घेतला न्याय' असा तो सिनेमा असेल. कारण, या देशात न्याय मिळत नाही, विकत घ्यावा लागतो. न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालं आहे. दबाव टाकला जातोय, असं ते म्हणाले.

'भाजपचा एक पॉर्नस्टार आमच्यावर आरोप करतो. तो लक्ष देण्यासारखा नाही. त्यामुळं आमची काही बदनामी वगैरे होत नाही. कारण ते खोटे आरोप असतात. याला तुरुंगात टाकीन, त्याला तुरुंगात टाकीन असं म्हणतो. पण मीरा-भाईंदरमधील एका प्रकरणात पुराव्यासह आम्ही काही भूमिका मांडल्यानंतर पॉर्नस्टारच्या कुटुंबाची बेअब्रू झाली. खरंतर हे आरोप मी केलेलेच नाहीत. जिथं भ्रष्टाचार झालाय, त्या महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी पुराव्यासह या संदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर त्या भागातील आमदार प्रताप सरनाईक जे सध्या भाजपसोबत आहेत, यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. चौकशीची मागणी केली. त्यावर विधानसभेत चर्चा झाली. प्रश्न उपस्थित केले गेले. विधानसभेनं चौकशीचे आदेश दिले. यात संजय राऊत कुठं आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

पॉर्नस्टारच्या पत्नीनं स्वत:च्या पतीकडं हिशेब मागावा!

‘पॉर्नस्टारच्या कुटुंबावर इतक्या लोकांनी आरोप केले आहेत तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. हे लोक इतरांवर आरोप करतात. मग त्यांच्यावरील आरोपांचीही चौकशी झाली पाहिजे. 'आयएनएस विक्रांत'च्या नावानंही यानं भ्रष्टाचार केला. कोट्यवधी रुपये गोळा केले. राज्यपालांना देतो सांगितलं. राज्यपाल म्हणतात मला मिळाले नाहीत. कोण देणार याचा हिशेब? द्या ना हिशेब. आम्ही काही बोलल्यामुळं पॉर्नस्टारच्या पत्नीची बेअब्रू झाली असेल तर तिनं आपल्या पॉर्नस्टार पतीकडं त्याच्या घोटाळ्यांचा हिशेब मागायला पाहिजे,’ असंही संजय राऊत यांनी खडसावलं.

Whats_app_banner
विभाग