मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ठाकरे सरकारविरोधात भाजप ‘अविश्वास’ मांडणार?; महाराष्ट्रात हालचालींना वेग

ठाकरे सरकारविरोधात भाजप ‘अविश्वास’ मांडणार?; महाराष्ट्रात हालचालींना वेग

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 27, 2022 07:18 PM IST

राज्य सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयावर राज्य सरकारच्या भवितव्याचा चेंडू राज्यपालांच्या कोर्टात आहे.

महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग
महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग

मुंबई– शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वाच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयावर राज्य सरकारच्या भवितव्याचा चेंडू राज्यपालांच्या कोर्टात आहे. दरम्यान राज्य सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईत भाजपची तर गुवाहाटीत शिंदे गटाची बैठक सुरू आहे. त्याचबरोबर मनसे नेत्यांची राज ठाकरेंसोबत बैठक सुरू आहे. त्यामुळे कधीही राज्य सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्यासह मविआच्या ५० आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढत असल्याचं याचिकेत म्हणत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी शिवसेनेने नोटीस पाठवली. याविरोधात शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना प्रक्षप्रमुख,राज्य सरकार, विधिमंडळ सचिवालय, केंद्र सरकार यांना ५ दिवसात उत्तर देण्यासाठी नोटीस जारी करण्यात आलेली आहे. जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत १६ आमदारांना आपले उत्तर दाखल करण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने दिली. ११ जुलैला पुढील सुनावणी होतपर्यंत शिंदे गटातील आमदारांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. ११ जुलैसायंकाळी साडे पाचपर्यंत १६ आमदारांना आपले म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात आली आहे.

कोर्टाच्या या निर्णयानंतर भाजप प्रत्यक्ष मैदानात उतरली आहे.कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर भाजपकडूनकायदेशीर बाबींची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेतेदेवेंद्र फडणवीस यांच्या'सागर' या निवासस्थानी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. महाविकास आघाडीविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची भाजपाची तयारी असल्याची माहिती समोर येत आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे बहुतांश मंत्री आज शिंदे गटात सामील झालेत. त्यात आता आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदे गट मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांच्यासोबत हातमिळवणी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. तसेचएकनाथ शिंदे यांनीराज ठाकरेंनाफोन करुन सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. परंतु मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अन्य काही नेत्यांची राज ठाकरे यांच्यासोबत बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मनसे सध्याच्या राजकीय घडमोडींवर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या