बंडखोरांविरोधात भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये! ४० जणांची पक्षातून हकालपट्टी! 'या' नेत्यांचाही समावेश
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बंडखोरांविरोधात भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये! ४० जणांची पक्षातून हकालपट्टी! 'या' नेत्यांचाही समावेश

बंडखोरांविरोधात भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये! ४० जणांची पक्षातून हकालपट्टी! 'या' नेत्यांचाही समावेश

Nov 06, 2024 10:36 AM IST

BJP Rebel Candidates : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या लढतीचे चित्र आता स्पष्ट झालं आहे. महायुतीला काही जागांवर बंडोबांना थंड करण्यात यश आलं असलं तरी काही जण निवडणुक रिंगणात आहेत. त्यामुळे पक्षशिस्त म्हणून तब्बल ४० बंडखोरांवर भाजपने कारवाई करत त्यांना पक्षातून काढून टाकलं आहे.

बंडखोरांविरोधात भाजप अ‍ॅक्शन मोडमद्धे! ४० जणांची केली पक्षातून हकालपट्टी! 'या' नेत्यांचा समावेश
बंडखोरांविरोधात भाजप अ‍ॅक्शन मोडमद्धे! ४० जणांची केली पक्षातून हकालपट्टी! 'या' नेत्यांचा समावेश (PTI)

BJP Rebel Candidates : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे. बंडखोरांनी दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी वाढवली आहे. अनेक जण निवडणूक रिंगणात असून त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही. दरम्यान, भाजपने पक्षातील बंडखोरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. तब्बल ४० बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या ४० जणांमध्ये अनेक बड्या नेत्यांचा देखील समावेश आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीला बंडखोरामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपने अनेक विद्यमान आमदार तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. पक्षातून मोठ्या प्रमाणात इच्छुक होते. मात्र, प्रत्येकाला संधी देणे शक्य नसल्याने अनेक जण नाराज झाले. भाजपमध्ये देखील अनेकांनी बंडाचे हत्यार उपसत उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. अर्ज माघारीच्या दिवशी काही जणांची मनधरणी करण्यात पक्ष नेत्यांना यश आलं आहे. मात्र, ४० जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही व निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या ४० जणांवर भाजपने मोठी कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

भाजपने केलेल्या या कारवाईमुळे निवडणूक निकालांवर परिमाण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील काही बंडखोर हे निवडून देखील येऊ शकतात. यामुळे मत विभागली जाऊन याच फटका पक्षाच्या उमेदवाराला बसू शकतो.

कारवाई करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये सोलापूर शहर उत्तर मधील शोभा बनशेट्टी, श्रीगोंदा येथील सुवर्णा पाचपुते, अक्कल कोट येथील सुनील बंडगर, तर अमरावती येथील जगदीश गुप्ता यांचा समावेश आहे, बडनेरा येथील तुषार भारतीय व नालासोपारा येथील हरिश भगत यांना देखील पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

या नेत्यांना दाखलवला भाजपने बाहेरचा रस्ता, वाचा यादी

नटवरलाल उंतवल

वैशाली मिलिंद देशमुख

मिलिंद उत्तमराव देशमुख

दिलीप वेंकटराव कंदकुर्ते

सुनील साहेबराव मोरे

श्रीकांत करले

सोपान पाटील

मयुर कापसे

आश्विन सोनवणे

गजानन महाले

नागेश घोपे

तुषार भारतीय

जगदीश गुप्ता

प्रमोद सिंह गडरेल

सोमदत्त करंजेकर

शंकर मडावी

ब्रिजभूषण पाझारे

वसंत वरजुरकर

राजू गायकवाड

अतेशाम अली

भाविक भगत

संजय घोगरे

सतीश जगनाथराव घाटगे

अशोक पांगारकर

सुरेश सोनवणे

शोभा बनशेट्टी

सुनिल बंडगर

सुवर्णा पाचपुते

विशाल प्रभाकर परब

जयश्री गरुड

हरिष भगत

बाळासाहेब मुरकुटे

स्नेहा देवेंद्र पाटील

वरुण सदाशिव पाटील

एकनाथ जाधव

कुणाल शिवाजी सुर्यवंशी

आकाश साळुंखे

गोपाळ जव्हेरी

धर्मेंद्र गोपीनाथ ठाकूर

दिलीप विठ्ठल भोईर

Whats_app_banner