मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाजपचे 'महाविजय २०२४’; मंगळवारी बावनकुळे घेणार मुंबईतील ३ लोकसभा मतदारसंघाचा आढावा

भाजपचे 'महाविजय २०२४’; मंगळवारी बावनकुळे घेणार मुंबईतील ३ लोकसभा मतदारसंघाचा आढावा

Jan 01, 2024 11:10 PM IST

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या मंगळवार, २ जानेवारीपासून मुंबई शहरातील लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहे. यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.

Maharashtra State BJP President Chandrashekar Bawankule
Maharashtra State BJP President Chandrashekar Bawankule (HT PHOTO)

भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून लोकसभानिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. 'महाविजय २०२४’ अंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या मंगळवार २ जानेवारीपासून मुंबई शहरातील लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहे. या प्रवासात ते मुंबईतील लोकसभा क्षेत्रातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

ट्रेंडिंग न्यूज

या प्रवासात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता भाजपचे मुंबई कार्यालय असलेल्या दादर पूर्व येथील वसंत स्मृती येथे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील चेंबूर, अणुशक्ती नगर व धारावी या विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे.

त्यानंतर दुपारी ३ वाजता भायखाळा पूर्व येथील दादोजी कोंडदेव मार्ग येथे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवडी, वरळी व भायखळा या तीन विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी ६ वाजता अंधेरी येथील युनिव्हर्सल बँक्वेट हॉल येथे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी या तीन विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. 

बावनकुळे यांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, मुंबई दक्षिण लोकसभा समन्वयक व राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा समन्वयक आमदार प्रसाद लाड, मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा समन्वयक आमदार अमित साटम, मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा प्रवास संयोजक संजय भेगडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,  मुंबई दक्षिण-मध्य भाजपा जिल्हा सरचिटणीस नीरज उभारे, मुंबई दक्षिण जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर, मुंबई उत्तर पश्चिम भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात येणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४