Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात! भाजपच्या चिंतन बैठकीतून विधानसभेचे रणशिंग फुंकणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात! भाजपच्या चिंतन बैठकीतून विधानसभेचे रणशिंग फुंकणार

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात! भाजपच्या चिंतन बैठकीतून विधानसभेचे रणशिंग फुंकणार

Updated Jul 21, 2024 07:13 AM IST

Amit Shah Pune : भाजपची चिंतन बैठक आज पुण्यात होणार असून या साठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात आले आहे. काल रात्री मुंबईत विमानाने दाखल झाल्यावर रात्रीच शहा यांचे पुण्यात आगमन झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात! भाजपच्या चिंतन बैठकीतून विधानसभेचे रणशिंग फुंकणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात! भाजपच्या चिंतन बैठकीतून विधानसभेचे रणशिंग फुंकणार

Amit Shah Pune : लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती तयार करण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहे. काल विशेष विमानाने मुंबईत उतरल्यानंतर ते पुण्यात दाखल झाले. पुण्यातील बालेवाडी येथे होणाऱ्या चिंतन बैठकीत ते आज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून या बैठकीत ते विधानसभेचा रोडमॅप सादर करण्याची शक्यता आहे. या सोबतच लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर देखील चिंतन केले जाणार आहे.

लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांत भाजपला राज्यात सपाटून मार खावा लागला. त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज पुण्यात भाजपचे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले असून या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अमित शहा पुण्यात

लोकसभा निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच अमित शाह पुण्यात येणार आहे. पुण्यात बालेवाडी येथे होणाऱ्या चिंतन बैठकीत अमित शाह लोकसभेत झालेला पराभवावर उवापोह आणि येणाऱ्या विधास रणधुमाळीचं रणशिंग फुंकणार आहे. त्या बैठकीला राज्यभरातील सर्व भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असून शहा हे त्यांना मार्गदर्शन करणार आहे.

पुण्यात होणाऱ्या आजच्या चिंतन बैठकीत अमित शहा हे पाच हजारांहून अधिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यात ते विधानसभा निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने जास्तीत जास्त जागा लढवायच्या व मित्र पक्षांना देखील योग्य उमेदवार निवडण्यासाठी आग्रह धरायचा, अशी रणनीती भाजपने आखल्याची समजते.

एक हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त

पुण्यात बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपची ही चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या बैठकीसाठी पुण्यात दाखल झाले आहे. या सभेसाठी तब्बल एक हजार पोलिसांचा बंदोबस्त बालेवाडी परिसरात तैनात करण्यात आला आहे. अमित शहा हे पुण्यात दाखल झाले असून सेनापती बापट रस्त्यावरील एका तारांकित हॉटेलमध्ये ते मुक्कामी आहेत. या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहे. आज बालेवाडी भागातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर