मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकनाथ शिंदे गटासाठी ज्योतिरादित्य पॅटर्न; भाजपचा मास्टर प्लान
Maharashtra political crisis
Maharashtra political crisis
27 June 2022, 14:09 ISTNinad Vijayrao Deshmukh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 14:09 IST
  • एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे ५० आमदार आहेत असा दावा केला जात आहे. यात शिवसेनेचे जवळपास ४० तर अपक्ष १० आहेत. या पैकी १६ आमदारांवर महाविकास आघाडी सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Maharashtra political crisis महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे अस्तिर झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदार गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन ब्लू मध्ये गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसले आहे. यातील १६ आमरदारांविरोधात राज्य शासनाने कठोर पावले उचलली असून विधानसभेच्या उपाध्यक्षांनी त्यांना नोटीस बजावली आहे. यामुळे त्यांनी सर्वाेच्च न्यायालयात दाद मागितली असून यावर आज सुनावणी होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एकनाथ शिंदे गाटाने त्यांच्याकडे ५० आमदार असल्याचा दावा केला आहे. यातील ४० हे शिवसेनेचे आहे. आघाडी सकारने यातील १६ आमदारांवर कारवाईची तयारी केली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. यावर उत्तर देण्यासाठी आज शेवटची तारीख आहे. यामुळे न्यायालय काय निर्णय देत यावर शिवसेना आणि शिंदे गटाची नजर सुप्रिम कोर्टाकडे राहणार आहे.

या नाट्यमय घडामोडींवर भाजपच्या भूमिकेवरही शंका घेतली जात आहे. कारण ज्या ठिकाणी बंडखोर थांबले आहेत. त्या ठिकाणी भाजपचे सरकार आहे. काल रात्री पासून देवेंद्र फडणवीस यांच्याघरी मोठ्या नेत्यांचे येणे जाणे आणि बैठकांचे सत्र वाढले आहे.

महाराष्ट्रातील या राजकीय संकटात महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार बीजेपीकडे प्लॅन बी तयार आहे. ज्या पद्धतीने मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या आमदारांनी जोतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वात पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत कमलनाथ सरकार पाडले होते. याच पद्धतीने महाराष्ट्रात शिवसनेचे बंडखोर आमदार हे सुद्धा राजीनामा देऊन बाहेर पडू शकतात. अशे झाल्यास महाविकास आघाडीचे सरकार अल्पमात येऊ शकतं. यामुळे ते विधानसभेत बहूमत सिद्ध करू शकणार नाहीत. यानंतर भाजपकडे सरकार बनविण्यासाठी दावा करण्याची संधी येऊ शकते. असे झाल्यानंतर पुन्हा उपनिवडणूका होण्याची शक्यता येऊ शकते. यात भाजपची भूमिका आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची राहिल.

शिंदे गटाचा शिवसेना पक्षावरच अधिकाराचा दावा

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदार शिवसेनेवरच आपला हक्क सांगत आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची हा प्रश्न उपस्थित होत आहे. बंडखोरांचे म्हणणे आहे ही आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानतो. त्यांच्या विचारांवर चालतो. मात्र, त्यांना शिवसेनेवर अधिकार सहजासहजी मिळवता येणे शक्य नाही. यामुळे अशा परिस्थीतत ते त्यांचा स्वत:चा वेगळा गट तयार करून सरकार स्थापन करू शकतात. यातही त्यांना अपयश आले तर त्यांना आमदारकीचा राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे त्यांचा गट ताकदवान असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यापुढे पक्ष कसा वाचवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. जे बंडखोर आमदार आहेत, त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात शिवसेनेला भक्कम पुणे उभे केले आहे. आता त्यांनीच बंडखोरी केल्यामुळे त्या क्षेत्रात शिवसेनेचे अस्तित्व काय राहिल यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.