मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dhananjay Munde: आता आमच्यात नातं उरलेलं नाही; धनंजय मुंडे यांनी बेधडक सांगून टाकलं!
पंकजा मुंडे - धनंजय मुंडे
पंकजा मुंडे - धनंजय मुंडे

Dhananjay Munde: आता आमच्यात नातं उरलेलं नाही; धनंजय मुंडे यांनी बेधडक सांगून टाकलं!

30 September 2022, 16:45 ISTNinad Vijayrao Deshmukh

Dhananjay Munde Vs Pankaja Munde : राजकीय विरोधामुळे आमच्यातील नाते आता संपले आहे, अशी जाहीर कबुली राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली असून यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. धनंजय मुंडे यांच्या या व्यक्तव्याला पंकजा मुंडे यांनी देखील उत्तर दिले आहे.

 राजकरणात रक्ताचे नाते देखील दुरावले जाते याचा प्रत्यय राज्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे नाते दुरावल्याची कबुली खुद्द धनंजय मुंडे यांनी दिली आहे. आमच्यात आता बहीण-भावाचे नाते उरले नाही असे मुंडे यांनी म्हटले असून त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उत आला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर पंकजा मुंडे या देखील व्यक्त झाल्या असून त्यांनी देखील सूचक विधान केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

धनंजय मुंडे यांनी त्यांच्यातील आणि पंकजा मुंडे यांच्यातील नात्याविषयी भाष्य केले होते. मुंडे म्हणाले होते की, आता आमच्यात बहीण-भावाचं नात हे उरलेले नाही. राजकारणामुळे आता आम्ही एकमेकांचे वैरी आहोत. आम्ही पूर्वी खऱ्या अर्थाने एकमेकांचे नातेवाईक होतो. पण राजकरणामुळे आमच्यात वैर निर्माण झाले आहे. त्यामुळे आम्ही आता दुरावलो असून अश्या वागण्यामुळे काय परिणाम होतो याचे ज्याचे त्याने आत्मपरीक्षण करावे असे धनंजय मुंडे म्हणाले.

भगवान गडाच्या दसऱ्याची परंपरा ही संतश्रेष्ठ भगवानबाबांनी सुरू केली. स्व.गोपीनाथ मुंडे असेपर्यंत ही परंपरा सुरू होती. आता कुणी मेळाव्याला जायचं कुणाला बोलवायचं. दसरा मेळाव्याला केंद्रीय मंत्र्याला आमंत्रण का दिले नाही ते त्यांनाच विचारा. आम्ही भाऊ-बहीण म्हणून राजकीय विरोधक आहोत. आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांबद्दल काय बोलावं हे ज्याने त्याने ठरवावं. मी त्याबाबत सांगण्यासाठी मी लहान आहे असे देखील धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. 

धनंजय मुंडे यांच्या या व्यक्तव्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “गोपीनाथ मुंडे यांनीच रक्ताचे नाते कधी संपत नाही असे सांगितले होते. मी वैर बाळगत नाही. माझ्यासाठी कोणीही राजकीय शत्रू नाही. मी व्यक्तीच्या विचारांशी राजकारणाची तुलना करत असून मला कुणी वैरी वाटत नाही, असे मुंडे म्हणाल्या.

विभाग