भाजपची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ‘या’ महिलांना संधी, जाणून घ्या त्यांची नावे
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाजपची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ‘या’ महिलांना संधी, जाणून घ्या त्यांची नावे

भाजपची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ‘या’ महिलांना संधी, जाणून घ्या त्यांची नावे

Oct 20, 2024 07:46 PM IST

Sreejayaa Chavan From Bhokar Constituency: भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी
अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी

BJP Candidates List for Maharashtra assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये काही दिग्गजांसह अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांच्या नावाचा समावेश आहे. श्रीजया या नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आले.

श्रीजया चव्हाण या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत. श्रीजया यांचा जन्म ६ मे १९९२ मध्ये झाला असून त्यांनी बी.ए, एल.एल.बी. चे शिक्षण घेतले आहे. याशिवाय, त्यांनी महिला सक्षमीकरण आणि इतर सामाजिक कार्यात आपले योगदान दिले आहेत. भाजपकडून आगामी विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया यांना तिकीट देण्यात आले आहे. आता महाविकास आघाडी या ठिकाणी कोणाला उमेदवारी जाहीर करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान, भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. या यादीमध्ये वांद्रे पश्चिम मतदारसंघातून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष सेलार आणि कणकवली मतदारसंघातून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याशिवाय, कामठीतून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कोथरूडमधून माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप राज्यात सुमारे १५० जागा लढवण्याच्या विचारात आहे.

 

भाजच्या पहिल्या यादीत १३ महिलांचा समावेश

१) श्रीजया अशोक चव्हाण - भोकर विधानसभा मतदार संघ

२) अनराधाताई अतुल चव्हाण - फुलंब्री विधानसभा मतदार संघ

३) सीमाताई महेश हिरे - नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघ

४) सुलभा गायकवाड - कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघ

५) मंदा विजय म्हात्रे - बेलापूर विधानसभा मतदार संघ

६) मनीषा अशोक चौधरी - दहिसर विधानसभा मतदार संघ

७) विद्या ठाकूर- गोरेगांव विधानसभा मतदार संघ

८) माधुरी सतीश मिसाळ - पर्वती विधानसभा मतदार संघ

९) मोनिका राजीव राजले - शेगाव विधानसभा मतदार संघ

१०) प्रतिभा पचपुते - श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ

११) नमिता मुंदडा - केज विधानसभा मतदार संघ

१२) श्वेता महाले - चिखली विधानसभा मतदार संघ

१३) मेघना बोर्डीकर - जिंतूर विधानसभा मतदार संघ

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर