भिंतीवरील हिरव्या रंगावर भाजप खासदाराने चढवला भगवा रंग; गणपतीचा फोटोही ठेवला, पुण्यात नेमकं काय घडलं?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भिंतीवरील हिरव्या रंगावर भाजप खासदाराने चढवला भगवा रंग; गणपतीचा फोटोही ठेवला, पुण्यात नेमकं काय घडलं?

भिंतीवरील हिरव्या रंगावर भाजप खासदाराने चढवला भगवा रंग; गणपतीचा फोटोही ठेवला, पुण्यात नेमकं काय घडलं?

Dec 30, 2024 09:06 AM IST

BJP MP Medha Kulkarni : पुण्यात भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी एका शाळेला लागून असलेल्या हिरव्या भिंतीवर भगव्या रंग लावून त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आणि फुले वाहिल्याने नवा वाद सुरू झाला आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

पुणे में भाजपा सांसद ने हरे रंग की दीवार को बनाया भगवा
पुणे में भाजपा सांसद ने हरे रंग की दीवार को बनाया भगवा

BJP MP Medha Kulkarni : पुण्यातील  सदाशिव पेठेमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग लावून चादर व  फुलं ठेवण्यात आली होती. या घटनेची दखल भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली असून त्यांनी या भिंतीवर भगवा रंग आणि गणपतीचा फोटो आणि फुले वाहिली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यावरून नवा वाद सुरू झाला असून काहींनी खासदार कुलकर्णी यांच्यावर टीका केली आहे. तर काहींनी त्यांचे समर्थ देखील केले आहे.  त्यांनी फेसबूकवर या बाबत पोस्ट देखील लिहिली आहे.  महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार वाढले असल्याचा दावा मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊ या कृती करूया, असं आवाहन देखील  मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे.  

पुण्याच्या भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या या कृतीमुळे  नव्या वादाला तोंड फुटले आहे.  शनिवारी मेधा कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांसह एका शाळे शेजारील भिंत हिरव्या रंगाने रंगवण्यात आली होती. कुलकर्णी यांनी ही भिंत  भगव्या रंगाने रंगवली. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप  सुरू झाले आहेत. भाजप खासदाराच्या या कृतीवर विरोधी पक्षांनी हल्ला चढवला आहे.  

आहे आहे घटना?

पुणे शहरातील सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये एका भिंतीला हिरवा रंग देण्यात आला होता. त्या ठिकाणी  हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा देखील  करण्यात आली होती. ही माहिती व याचा  व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यावर  भाजप खासदार मेधा कुलकर्णी व त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी  हिरवा रंग दिलेल्या या भिंतीवर पुन्हा भगवा रंग दिला व त्या ठिकाणी गणपतीचा फोटो ठेवला.  

यानंतर मेधा कुलकर्णी यांनी फेसबूक पोस्ट देखील लिहिली. त्यांच्या या पोस्टची देखील चर्चा आहे.  कुलकर्णी यांनी पोस्टमध्ये लिहिलं की,  सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आल्याचे फोटो व्हाट्सअपवर व्हायरल झाले होते.  मी आज आवर्जून त्या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी गेले. आधी खात्री करून घेतली आणि मग  संग्राम ढोले पाटील, संकेत मेहंदळे, यशपाल जाधव आणि दातेरे यांच्या समवेत हिरव्या  रंगावर भगवा रंग असा चढवला की मजा आली.

पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले आहेत. आधी छोटेखानी स्वरूप असलेले असलेली ही स्थळे अचानक नंतर काबीज केली जात आहेत. आपण सतर्क राहूया. माझी सर्वांना एकच विनंती आहे आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया कृती करूया. मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये त्यांचा फोन नंबरही देखील शेअर केला आहे. 

मेधा कुलकर्णी यांचे ट्विट समोर आल्यानंतर बराच गदारोळ झाला.  उद्धव ठाकरे गटाने यावर टीका केली आहे. त्यांनी कुलकर्णी यांच्या या कृतीला  बालिश म्हटले आहे. शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी भाजपच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी किंवा मेधा कुलकर्णी यांनी भिंत रंगवताना जेवढी काळजी दाखवली, तेवढीच काळजी महिला सुरक्षेसारख्या प्रश्नांबाबत दाखवली होती का?  असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर