भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी तुफान फटकेबाजी करत जिल्ह्यातील राजकारण व गुन्हेगारीवर भाष्य केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार सुरशे धस आणि मंत्री पंकजा मुंडे एकाच मंचावर आल्याचंही पाहायला मिळालं. बीडमधील राजकीय वातावरण तापलं असताना आज मंत्री पंकजा मुंडे व आमदार सुरेश धस एकाच मंचावर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सुरेश धस म्हणाले, मी काहीही बोललं की, बीड जिल्ह्याची बदनामी होतेय असं काहीजण म्हणतात. या जिल्ह्याने क्रांती सिंह नाना पाटील, बबनराव ढाकणे दिले,प्रमोद महाजन यांच्यासारखा उंचीचा माणूस निवडून दिला. गोपीनाथव मुंडे यांच्यासारखा पहाडासारखा माणूस दिला.आज ज्या जमिनीवर या कामाचा शुभारंभ होतोय,प्रकल्प उभारतोय ती जमीन संरक्षण विभागाकडे जाणार होती,पण जॉर्ज फर्नाडीस संरक्षणमंत्री असताना मुंडे साहेबांनी ही जमीन सोडवून घेतली अशी आठवणही धस यांनी सांगितली.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी ठामपणे बाजू लावून धरत मंत्री धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडले आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात काही जणांनी बीडची बदनामी केली, असा निशाणा नाव न घेता सुरेश धस यांच्यावर साधला. यावर पलटवार करताना धस यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना चांगलेच सुनावले. मी काहीही बोलले की, बीडची बदनामी केली,असे काही लोकांना वाटते. पण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठबळ देऊन राजकारण करणाऱ्यांनीच खरे तर बीडची बदनामी केली, असे सुरेश धस म्हणाले.
आमदार सुरेश धस यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘आधुनिक बाहुबली’ असा उल्लेख केला. धस म्हणाले की, फडणवीसांनीसभागृहात सांगितले तुम्हाला३००कोटी रुपये दिले आणि लगेच देवून पण टाकले. आम्हाला दुसऱ्या कोणाकडूच अपेक्षा नाही. कारण,फक्त देवेंद्र बाहुबलीच आम्हाला ते देऊ शकतात.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या भाषणात सुरेश धस यांचा ‘आधुनिक भगिरथ’ असा उल्लेख केला.
संबंधित बातम्या