Suresh Dhas : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण कमालीचं तापलं आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना प्राजक्ता माळीचा उल्लेख केला होता. प्राजक्ताताई माळींचा जवळचा पत्ता शोधायचा असेल तर परळी पॅटर्न आहे, असे वक्तव्य धस यांनी केला आहे. आमदार धस यांनी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याच्या हेतूने भाष्य केल्याचा आरोप करत प्राजक्ता माळीने आक्रमक होत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. कला विश्वासह सर्व स्तरातून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी एक पाऊल मागे घेत याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.
आमदार सुरेश धस यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी प्राजक्ता माळीसंबंधी विचारण्यात आलं होतं. यावेळी ते म्हणाले की,“प्राजक्ता माळीचा विषय संपला. त्या विषयावर मी बोलणार नाही. जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरे जायला तयार आहे.पण अखेर त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे.
सुरेश धस म्हणाले की,"प्राजक्ता माळीबाबत मी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता. मी त्यांच्या चारित्र्यावर बोलण्याचा विषयच नव्हता. मी प्राजक्ता माळीसह सर्व स्त्रियांबद्दल आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाल्याने त्यांचं किंवा कोणत्याही महिलेचं मन दुखावलं असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो.
माझ्याकडून काहीही चुकलेलं नाही किंवा चुकीचे बोललो नाही. मात्र तरीही मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण माझा फोकस हा संतोष देशमुख यांचा झालेला खून, त्याची पुढील प्रक्रिया यावर आहे, अशीही भूमिका सुरेश धस यांनी मांडली आहे.
मला याबाबत आमचे नेते चंद्रकांत पाटील यांचा फोन आला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की, चूक असेल किंवा नसेल माफी मागून टाका. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की लगेच माफी मागून टाकतो, असंही सुरेश धस म्हणाले.
बीड जिल्ह्यात'आकां'ची १०० ते १५० एकर जमीन आहे. त्यांनी आपल्या जमिनीत ३० ते ४० कोटी रुपयांचे बंधारे बांधून घेतले आहेत. त्य़ांच्याकडे पाच वर्षात इतका पैसा कुठून आला. परळीत प्राजक्ता, सपना व रश्मिका येत असतात. ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचं शिक्षण घ्यायचं असेल त्यांनी परळीत यावे. प्राजक्ता माळी ही आमच्याकडे येत असतात. त्यांचा अतिशय जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न बघितला पाहिजे, असे विधान त्यांनी केलं होतं.
संबंधित बातम्या