महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली

महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली

Nov 06, 2024 07:44 PM IST

Sadabhau Khot on sharad Pawar : सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आता महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?”,असा एकेरी उल्लेख सदाभाऊ खोतांनी केला आहे.

पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली

Sadabhau Khot On Sharad Pawar :विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. महाआघाडी वमहायुतीकडून राज्यातील विविध ठिकाणी प्रचारसभा होत आहेत. दरम्यान, आज सांगलीच्या जतमध्येगोपीचंद पडळकर यांच्याप्रचारार्थ महायुतीची सभा झाली. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस(शप) प्रमुख शरद पवारांवर त्यांच्या शारीरिक व्यंगावरून बोचरी टीका केली.

सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आता महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?”,असा एकेरी उल्लेख सदाभाऊ खोतांनी केला आहे. महाराष्ट्र बदलायचा आहे म्हणजे तुला कसला चेहरा पाहिजे?”अशी देखील टीका सदाभाऊ खोत यांनी केली. जतमधील महायुतीच्या सभेत सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?

जतमधील प्रचार सभेत बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, अरे पवार साहेब,तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले,बँका हाणल्या,सुतगिरण्या हाणल्या,पण पवारांना मानावं लागेल,एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं,मला महाराष्ट्र बदलायचा आहे,मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा?तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का महाराष्ट्र? अशी जहरी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

महायुती सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्याला सन्मानाने उभं केलं. पहिली कर्जमाफी ही देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झाली. शरद पवार, काँग्रेस व उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना का घेरलंय माहितीय का? राज्याची तिजोरी ही गाय आहे. गायीची जी कास आहे त्या कासेला चार थाणं आहेत. या अर्धा थाणातलं वासराला पाजायचं म्हणजे आपल्याला, आणि साडेतीन थाणातलं दूध आपणच हाणायचं. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, चारही थाणं ही वासराचीच आहेत. मी सर्व दूध वासरालाच देणार. म्हणजे जनतेला. मग शरद पवार साहेबांना नऊवा महिना लागला आणि कळा सुटल्या, त्यांना आपल्या चेल्यापेल्याची काळजी सतावू लागली,अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

जितेंद्र आव्हाडांचे खोतांना प्रत्युत्तर –

आव्हाडांनी पलटवार करताना म्हटले की, सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल बोलताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्यामुळे त्यांचा जबडा काढण्यात आलेला आहे. ज्यावेळी त्यांचं ऑपरेशन झालं त्याच्या काही दिवसानंतर लगेच शरद पवार तोंडातून रक्त येत असताना देखील सभांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे आपण काय बोलतो याची काही समज नाही का आपल्याला. महाराष्ट्र घडवण्यात तुमचा एक टक्का वाटा नाही,शरद पवारांचा शंभर टक्के वाटा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची अक्कल शून्यता लक्षात येते. तुमची अक्कल धुळीला मिळालेली आहे. सदाभाऊ खोत तुमच्या वडिलांची तुम्ही अशी टिंगल केली असती का? तुमच्या चेहऱ्यावर डाग पडला तर घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल, असे सडेतोड प्रत्युत्तर आव्हाडांनी दिले आहे.

Whats_app_banner