'शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ तर सुप्रिया सुळे किडकी बहीण, लिंबाच्या झाडापासून... ' भाजपा नेत्याची जहरी टीका-bjp mla gopichand padalkar criticizes on ncp leader sharad pawar and supriya sule ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ तर सुप्रिया सुळे किडकी बहीण, लिंबाच्या झाडापासून... ' भाजपा नेत्याची जहरी टीका

'शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ तर सुप्रिया सुळे किडकी बहीण, लिंबाच्या झाडापासून... ' भाजपा नेत्याची जहरी टीका

Sep 06, 2024 06:59 PM IST

Gopichand padalkar on supriya sule : शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे. सुप्रिया सुळे लहानपणीच हे सर्व शिकल्या आहेत. बाप तसा लेक आहे. लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करू नका, अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

भाजपा नेत्याची शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यावर जहरी टीका
भाजपा नेत्याची शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यावर जहरी टीका

शरद पवार (Sharad Pawar) हे जातीयवादाचं विद्यापीठ आहेआणि सुप्रिया सुळे या लहानपणीच त्यांच्याकडून हे सगळं शिकल्या आहेत. जसा बाप तशीच लेक. लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका, अशी जहरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे.

पडळकर म्हणाले की, सुप्रिया सुळे (Supriya sule) म्हणतात की, अजित पवारांवर सहानुभूती दाखवू नका. जरांगे-शिंदे आणि पवार हे तिघंही मराठा म्हणून जरांगे शिंदेंबद्दल बोलायचं नाही, असं सुप्रिया सुळे बोलल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता यात वेळीच हस्तक्षेप करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन इथं महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे -

‘जरांगे-शिंदे-पवारसे बैर नही, देवेंद्र फडणवीस तेरी खैर नही’, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी एका सभेत केली होती. या टीकेवर भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी उत्तर देत म्हटले की, सुप्रिया सुळे म्हणजे किडकी बहीण आहेत. अजित पवारांनाही सहानुभूती दाखवायची नाही असंसुळे म्हणतात. अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरत असताना सुप्रिया सुळे स्वत:तील किडकी बहीण महाराष्ट्राला दाखवत आहेत, अशी खोचक टीकाही गोपीचंद पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर केली.

शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ आहेत. जे लहानपणापासून शरद पवारांकडून सुप्रिया सुळे शिकल्या आहेत. त्यामुळे लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं गैर आहे. जसा बाप तशी लेक.

केवळ ब्राम्हण म्हणून फडणवीसांना टार्गेट -

पडळकर म्हणाले की, केवळ ब्राम्हण असल्यामुळे फडणवीसांना जाणून-बुजून टार्गेट केलं जात आहे. विशिष्ट संघटनांना बळ देऊन, काही पत्रकारांना हाताशी धरून फडणवीसांवर टीका केली जात आहे. स्वत:ला पुरोगामी म्हणायचं आणि राजर्षी शाहू महाराजांचे वारस संभाजी महाराजांना देवेंद्र फडणवीसांनी खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आता पेशवे छत्रपतींना नेमतात,अशी वक्तव्य करायची. खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा खासदार करण्यापूर्वी राजर्षी शाहू महाराजांच्या वारसांना तुम्ही कधीही खासदारकी दिली नव्हती,अशी टीकापडळकर यांनी केली आहे.

Whats_app_banner