BJP News : शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात हाणामारीची घटना ताजी असतांनाच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका भाजप आमदाराने आपल्याच पदाधिकाऱ्याला मारहाण केली. मारहाण झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने या प्रकरणी मुंबईतील मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मंत्री अतुल (mla atul save) सावे असे मारहाण करणाऱ्या आमदाराचे नाव आहे. तर आसाराम डोंगरे असे मारहाण झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. डोंगर यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. तक्रारदार आसाराम डोंगरे हे मंत्री अतुल सावेंना भेटायल गेले होते. यावेळी सावे यांनी 'तू देवेंद्र फडणवीस व बावणकुळेंच्या संपर्कात राहतोस असे म्हणत मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सावे यांच्यासह त्यांच्या दोन स्वीय सहाय्यकांनीही डोंगर यांना मारहाण केली. यामुळे सावे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारदार डोंगरे यांनी केली आहे.
डोंगर हे औरगाबाद येथील रहिवासी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे श्री देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठान असून ते त्यांचे अध्यक्ष आहेत. डोंगर हे १ मार्चला कॅबीनेट मंत्री अतुल सावे यांना कामानिमित्त भेटायला गेले होते. सावे यांनी त्यांना या बद्दल जाब विचारत तू इथे कशाला आलास, मी तुझे कुठलेच काम करणार नाही. तू देवेंद्र फडणवीस काय, श्री नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांना सांगितले तरी मी तुझे काम करणार नाही असे म्हणत डोंगर यांनी आणलेल्या निवेदनाच कागद फेकून देऊन त्यांना मारहाण केली.
यावेळी सावे यांचे पीए प्रविण चव्हाण तसेच दुसरा पीए अशोक शेळके यांनी सुद्धा डोंगरे यांना मारहाण केली. तू देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेच्या संपर्कात राहतोस. एवढा मोठा झालास का, तुझी औकात काय असे म्हण शिवीगाळ करून त्यांना मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर त्यांना त्यांच्या कार्यालयातून हाकलून दिले. सावे यांनी या आधीही मारहाण आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप डोंगर यांनी केला.
संबंधित बातम्या