Devendra Fadnavis: गणेशोत्सवानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार का? देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट-bjp leadership to decide on eknath khadse reinduction after ganesh festival says devendra fadnavis ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis: गणेशोत्सवानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार का? देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

Devendra Fadnavis: गणेशोत्सवानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार का? देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

Sep 14, 2024 03:49 PM IST

Devendra Fadnavis On Eknath Khadse reinduction: एकनाथ खडसेंच्या भारतीय जनता पक्षात परतण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

एकनाथ खडसेंच्या भारतीय जनता पक्षात परतण्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...
एकनाथ खडसेंच्या भारतीय जनता पक्षात परतण्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis News: शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले भाजपचे माजी नेते खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आला. एकनाथ खडसे यांनी तयारी दर्शवली असली तरी भाजपकडून अद्याप त्यांच्या प्रवेशाबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. खडसेंच्या भारतीय जनता पक्षात परतण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्याचा निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्व गणेशोत्सवानंतर घेईल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले, मात्र अनेक महिन्यांनंतरही त्यांचा भाजपात अधिकृत प्रवेश झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबबत मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुलीची शपथ घेऊन मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, असा दावा त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. याबाबत नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'एकनाथ खडसेंचे विधान मी ऐकलेले नाही. पण खडसेंच्या बाबतीत आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे. केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून, त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल', असे त्यांनी म्हटले आहे.

पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी क्रूड आणि रिफाइंड सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरील बेसिक कस्टम ड्युटी वाढवण्याचे स्वागत केले. सरकारने शुक्रवारी कच्च्या पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल बियाणे तेलावरील मूळ सीमा शुल्क शून्यावरून २० टक्के आणि रिफाइंड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील मूळ सीमा शुल्क १२.५ टक्क्यांवरून ३२.५ टक्के केले. तसेच कांदा निर्यातीवरील शुल्क ४० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आणले असून ते ४ मेपासून लागू आहे. शेतकऱ्यांना शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी मोदी सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. याआधी कांद्याच्या प्रश्नावर संकट निर्माण झाले होते. परंतु कांद्यावरील निर्यात शुल्कात कपात करण्याचा सरकारचा निर्णय या पिकाच्या उत्पादकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या सर्व निर्णयांचा फायदा सोयाबीन, कांदा आणि बासमती भात उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून त्याचा अप्रत्यक्ष फायदा कापूस उत्पादकांनाही होणार आहे.

पोर्ट ब्लेअरचे नाव बदलले

पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आल्याचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, गुलामगिरीची चिन्हे काढून टाकली पाहिजेत. अंदमान-निकोबार बेटांच्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केली.

Whats_app_banner