Pankaja Munde: पुढचा भूकंप भाजपमध्ये?; भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर
Pankaja Munde News: भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
BJP Leader Pankaja Munde likely to joining Congress: महाराष्ट्रात वर्षभरात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी बंड पुकारला. अजित पवारांनी भाजप- शिंदे सरकारसोबत हात मिळवून उपमुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शप्पथ घेतली. यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालेले असताना भाजपच्या गोट्यातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली. भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
पंकजा मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी दोन वेळा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली. यावेळी पंकजा मुंडे आणि सोनिया गांधी यांच्या पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या पंकजा मुंडे सध्या महासचिव आहेत. आधीच नाराज असलेल्या पंकजा मुंडे आता काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत मात्र अजून त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा प्रतिक्रिया दिली नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी 'बीआरएस'कडून पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली. यानंतर पंकजा मुंडे भाजपला सोठचिठ्ठी देणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. या ऑफरबाबत पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या होत्या की, "मी अशा कोणत्याही ऑफरकडे अजून तरी सिरीयसली पाहिले नाही", अशी सूचक प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.