मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vinayak Mete: 'सकाळचे फोन निगेटिव्हच असतात', मेटेंच्या निधनानंतर पंकजा मुंडे वडिलांच्या आठवणीत भावूक

Vinayak Mete: 'सकाळचे फोन निगेटिव्हच असतात', मेटेंच्या निधनानंतर पंकजा मुंडे वडिलांच्या आठवणीत भावूक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 14, 2022 12:01 PM IST

Vinayak Mete Passed Away : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचं आज सकाळी पहाटे कार अपघातात निधन झालं आहे.

Pankaja Munde On Vinayak Mete Death
Pankaja Munde On Vinayak Mete Death (HT)

Vinayak Mete Death In Car Accident : शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं आज पहाटे कार अपघातात निधन झाल्यानं राज्यात शोककळा पसरली आहे. याशिवाय भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही मेटे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून 'सकाळचे कॉल्स निगेटिव्हच असतात', असं म्हणत त्यांचे वडिल गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

विनायक मेटेंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मेटे यांचा अपघात झाल्याचं मला सकाळी साडेसहा वाजता कळलं, तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं मला कळालं, याशिवाय यापेक्षाही वाईट बातमी समोर येऊ शकते, अशी माहितीही मला मिळाली होती, परंतु थोड्यावेळानं मी कन्फर्म केल्यानंतर त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळाल्याचं मुंडे म्हणाल्या. मेटेंच्या निधनानं मला धक्का बसला असून आतापर्यंतचा माझा अनुभव पाहता सकाळी आलेले फोन हे निगेटिव्हच असतात, असं म्हणत पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.

वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, वयाच्या ५२ व्या वर्षीच मुंडेसाहेबांचं निधन झालं, त्यांचा तो उमेदीचा काळ होता, राजकीय क्षेत्रात मुंडेसाहेबांनी बुद्धी आणि नियोजनाच्या जोरावर अनेक पदं मिळवल्याचं मुंडेंनी सांगितलं. याशिवाय मी २२ ते २३ वर्षांची होती तेव्हापासून मी विनायक मेटेंचं काम पाहत आलेली आहे, मराठ्यांना आरक्षण मिळावं, यासाठीही त्यांनी नेहमीच प्रयत्न केलेले आहे, हुशार बीडचा भूमिपूत्र हरवला, याबद्दल फार वाईट वाटत असल्याची भावना पंकजा मुंडेंनी व्यक्त केली आहे.

माझं लग्न झालं होतं तेव्हा मेटेंनी...

पंकजा मुंडे यांनी मेटेंच्या आठवणींना उजाळा देताना म्हटलं की, जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मेटेंनी विलासराव देशमुख आणि मुंडेसाहेबांसह अनेक नेत्यांना एकत्र आणत भव्य कार्यक्रम केला होता, काही दिवसांपूर्वी आमची सागर बंगल्यावर भेटदेखील झाली होती. १५ ऑगस्टनंतर आम्ही भेटणार होतो, परंतु आता त्यांना कधीही भेटणं शक्य नसल्याची भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या