मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde : परळी मतदारसंघातून कोण लढवणार निवडणूक? पंकजा मुंडेंनी एका वाक्यात विषय संपवला; म्हणाल्या...

Pankaja Munde : परळी मतदारसंघातून कोण लढवणार निवडणूक? पंकजा मुंडेंनी एका वाक्यात विषय संपवला; म्हणाल्या...

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 09, 2023 07:42 PM IST

Pankaja munde on Election : परळीमध्ये पंकजा मुंडे की धनंजय मुंडेयांना संधी मिळेल, यावरपंकजा मुंडे म्हणाल्या की, ज्यांनी राष्ट्रवादीसोबत युती केली आहे ते ठरवतील आणि तेच मला सांगतील काय करायचं.

 Pankaja  munde
Pankaja  munde

शिवशक्ती परिक्रमा दौऱ्यावर असलेल्या पंकजा मुंडे आज नगर जिल्ह्यात होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी बीडच्या परळी विधानसभा उमेदवारीवर पहिल्यांदाच भाष्य केलं. पंकजा म्हणाल्या की, मला राज्यातून पंचवीस ठिकाणी आमदारकीला उभे राहण्याच्या मागण्या आल्या आहेत. त्याचबरोबर पाथर्डीमधूनही निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यात भाजप व शिंदेंच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादीचा गटही सत्तेत सामील झाल्याने आगामी निवडणुकीत राज्यात अनेक मतदारसंघात निवडणूक तिकीट वाटपामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आता परळीमध्ये पंकजा मुंडे की धनंजय मुंडेयांना संधी मिळेल, यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, ज्यांनी राष्ट्रवादीसोबत युती केली आहे ते ठरवतील आणि तेच मला सांगतील काय करायचं. मला तो निर्णय पटला तर मी काय करायचे ते पुढं ठरवेल.

 

बीडमध्ये पंकजा मुंडेंवर जेसीबीतून पुष्पवृष्टी

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे बीड जिल्ह्याच्या सीमेवर पाचंग्री गावात भव्य स्वागत करण्यात आले. पंकजा मुंडे यांच्यावर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून जल्लोषी स्वागत करण्यात आले. शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे आज अहमदनगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात आगमन झाले.

 

यावेळी कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात तोफांचीआतषबाजी करण्यात आली.दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर पंकजा मुंडे जिल्ह्यात येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

WhatsApp channel