मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Beed News : भाजप नेत्याचा पुतण्या भीषण कार अपघात ठार; सीटबेल्ट लावल्याने मित्र वाचला

Beed News : भाजप नेत्याचा पुतण्या भीषण कार अपघात ठार; सीटबेल्ट लावल्याने मित्र वाचला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 14, 2023 12:02 PM IST

Beed accident : राज्यात राजकारणी लोकांच्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. आमदार बच्चू कडू यांच्या अपघाताची घटना ताजी असताना बीड येथे भाजप नेत्याच्या पुतण्याच्या गाडीला भीषण अपघात झाला असून यात त्याचा मृत्यू झाला आहे.

Beed News
Beed News

बीड: बीडमध्ये रस्ते अपघातात भाजपनेत्याच्या पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भाजप नेते मोहन जगताप यांचा पुतण्या विश्वजीत जीवन जगताप यांचा भीषण अपघात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास गेवराई बायपास जवळ घडली. या अपघातात त्यांचा मित्र हा थोडक्यात बचवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील छत्रपती नागरिक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचा मुलगा विश्वजीत जगताप आणि त्यांचा मित्र आर्यन कंटुले हे औरंगाबाद येथे गेले होते. परत येत असतांना माजलगाव जवळील गेवराई जवळ बायपास मार्गावर शुक्रवारी रात्री १२ च्या दरम्यान विश्वजीतचे कार वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांची कार टेम्पोवर जाऊन धडकली.

या अपघातात विश्वजीतच्या डोक्याला गंभीर मार लागला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र आर्यन कंटुले याने सीट बेल्ट लावलेला असल्याने तो सुदैवाने बचावला. त्याला किरकोळ मार लागला. विश्वजीत जगताप यांच्या मागे आई-वडील दोन बहिणी असा परिवार आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या