Harshvardhan Patil : “इचलकरंजी मतदारसंघ पाकव्याप्त काश्मीर मानला पाहिजे”, हर्षवर्धन पाटलांचं वादग्रस्त विधान
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Harshvardhan Patil : “इचलकरंजी मतदारसंघ पाकव्याप्त काश्मीर मानला पाहिजे”, हर्षवर्धन पाटलांचं वादग्रस्त विधान

Harshvardhan Patil : “इचलकरंजी मतदारसंघ पाकव्याप्त काश्मीर मानला पाहिजे”, हर्षवर्धन पाटलांचं वादग्रस्त विधान

Updated Jul 15, 2024 10:48 PM IST

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांनी इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे. पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील

Harshvardhanpatil controversial statement : भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना इचलकरंजीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हर्षवर्धन पाटलांनी इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे. पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी सलग हातकणंगले मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. याबद्दल माने यांचे अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ हा तसा पाहिला तर पाकव्याप्त काश्मीर मानायला पाहिजे. या मतदारसंघात माने यांनी विजय मिळवत वादळात दिवा लावला आहे. मात्र पाटील यांच्या या विधानावर राजकीय पक्षाकडून तिखट प्रतिक्रिया येऊ शकतात.

सांगली येथे आयोजित सभेत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणालेकी,मी खासदार धैर्यशील माने यांचं अभिनंदन करतो. कारण इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ हा तसा पाहिला तर पाकव्याप्त काश्मीर मानायला पाहिजे. कारण आजूबाजूला सगळी मोठंमोठी वादळं होती. आजूबाजूला सगळ्या शक्ती विरोधात उभ्या ठाकल्या होत्या. काही शक्ती अदृश्य होत्या,तर काही दृश्य होत्या. या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी येथे विजय मिळवला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत धैर्यशील माने यांनी या वावटळात दिवा लावला आहे. त्यामुळे मी धैर्यशील माने यांचं मनापासून अभिनंदन करतो.

१९७५ ते २००९ पर्यंत हातकणंगले हा मतदारसंघ इचलकरंजी नावाने ओळखला जात होता. मात्र २००९ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर या मतदारसंघाचं नाव हातकणंगले असं करण्यात आलं. या हातकणंगले मतदारसंघात यावेळी खुपच अटीतटीची लढत पाहायला मिळाली. ठाकरे गट, शिंदे गट व स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यात तुल्यबळ लढत झाली. मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजीत पाटील यांचा अवघ्या १३ हजार मतांनी पराभव केला.

या विजयाबद्दल बोलताना धैर्यशील माने म्हणाले की,पश्चिम महाराष्ट्रात अनेक बुरुज ढासळले असताना मी वादळात दिवा लावला. मतमोजणीच्या दिवशी माझ्या मतदारसंघात दुपारपासूनच विरोधक गुलाल लावून फिरू लागले होते. मात्र सायंकाळपर्यंत विजयाची पारडे झुलत होते. शेवटी मशाल मशाल विझल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर