मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'एकनाथ शिंदेंच्या बंडाशी संबंध नाही, कुठलाही प्रस्ताव आलेला नाही'

'एकनाथ शिंदेंच्या बंडाशी संबंध नाही, कुठलाही प्रस्ताव आलेला नाही'

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 24, 2022 12:14 PM IST

राज्यात सुरू असलेल्या गोंधळाशी भाजपचा काही संबंध नाही. एकनाथ शिंदे यांनी कुठलाही सत्ता स्थापनेसाठी कुठलाही प्रस्थाव दिला नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील (Deepak Salvi)

Maharashtra political crisis राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. भाजपचे नेते शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या वर टीका करत आहेत. तर या बंडामागे भाजपचाच हात आहे अशी टीका केली जात आहे. दरम्यान, या वर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. शरद पवार(Sharad Pawar) आणि खासदार संजय राऊत यांनाच फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र आहे, असा टोला लगावत एकनाथ शिंदे यांच्या कडून सत्तास्थापनेचा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

काल शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या सर्वा घडामोडींमागे भाजप असल्याचा आरोप केला. तसेच बंडखोरांना या ठिकाणी यावीच लागेल आणि त्यांना याची किंमत चुकवावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, पवारांच्या या वक्तव्यावर खासदार राणे यांनीही धमकीवजा ट्विट करत पवार यांना लक्ष केले. त्यावर संजय राऊतांनीही व्टिट केले. या आरोप प्रत्यारोपात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राज्यात ज्या उलथापालथी होत आहेत. त्याचा भाजपचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घटना घडामोडींशी आमचा काही संबंध नाही. राज्यात मी भाजपची अधिकृत भूमीका मांडत असतो. त्यामुळे कोण काय बोलतं याला काही महत्व नाही. मात्र, आमचे नेते सर्वांना उत्तर देऊ शकतात. मोहित कंबोज यांचे अनेक पक्षात मित्र आहेत. एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांचे मित्र आहेत. शिंदे यांचे सर्व पक्षात मित्र आहेत.

राज्यसभा, विधान परिषदेच्या यशानंतर देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या प्रमाणत लोक भेटीला येत आहेत. राज्यातील उलथा पालथी बद्दल काही माहिती नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या