मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashish Shelar : “पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली..”, शेलारांची शिवसेनेवर टीका
शेलारांची शिवसेनेवर टीका
शेलारांची शिवसेनेवर टीका

Ashish Shelar : “पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली..”, शेलारांची शिवसेनेवर टीका

22 September 2022, 16:55 ISTShrikant Ashok Londhe

पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली... आयना का बायना... घेतल्याशिवाय जायना असे वागणाऱ्यांकडून सगळ्या टक्केवारीचा हिशेब मुंबईकरच मागत आहेत, अशी टीका आशिष शेलार यांनी शिवसेना व उद्धव ठाकरेंवर केली आहे.

Ashish shelar slams Shivsena :शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपावर टीका करताना मुंबई पालिकेची निवडणूक महिनाभरात लावा, असे आवाहन केले होते. त्यावरूनमुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. आमची रोखठोक सच्चाई असं म्हणत शिवसेनेला उद्देशून खुलं पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये मुंबईतील विविध मुद्दयांचा उल्लेख करून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली... आयना का बायना... घेतल्याशिवाय जायना असे वागणाऱ्यांकडून सगळ्या टक्केवारीचा हिशेब मुंबईकरच मागत आहेत... हसीना पारकर सोबत देवाणघेवाण, कसाबला बिर्याणी, याकूबच्या कबरीवर रोषणाई करणारे आता म्हणे, भाजपाचा कोथळा काढणार? वा रे वा!" असं म्हणत बोचरी टीका केली आहे.

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "होय, मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी वाढवण्याचे आव्हान स्विकारले!! पेंग्विन सेनेच्या हाती धुपाटणे यायची वेळ आली! भ्रष्टाचार करणाऱ्या काँग्रेस सोबत सलगी आणि शिवसेनेला संपवून स्वतः वाढणाऱ्या राष्ट्रवादी सोबत अती प्रेमाचे उमाळे यामुळे स्वपक्षातील लढवय्ये मोहरे पक्ष सोडून गेले. महाराष्ट्र हातून गेला, आता मुंबईकरांचे हातून मुंबई काढून घेणार याची चाहूल लागली. त्यामुळे तेलही गेले आणि तुपही गेले हाती' धुपाटणे फक्त शिल्लक राहण्याची वेळ आली अशी अवस्था पेंग्विन सेनेची झाली आहे."

हसीना पारकर सोबत देवाणघेवाण, कसाबला बिर्याणी, याकूबच्या कबरीवर रोषणाई करणारे आता म्हणे, भाजपाचा कोथळा काढणार? वा रे वा! कसाब तुम्हाला खंजीर देऊन गेलाय की काय? भाजपाचा राजकीय कोथळा काढायला? ही औरंगजेबी भाषा आपल्या तोंडी शोभते का? स्वतः मुख्यमंत्री होतात तेव्हा का निवडणूक लगेचच घेतल्या नाहीत? आणि आज आम्हाला काय सांगताय लगेच निवडणूक घ्या... आम्ही तयार आहोत...तुमच्याकडे तुमचा धनुष्यबाण तरी हातात आहे का?" असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.