मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashish Shelar : सगळे गेले फक्त असरानी उरलेत; शोलेतील डायलॉगबाजी करत शेलारांचा ठाकरेंवर पलटवार
Ashish Shelar On Uddhav Thackeray
Ashish Shelar On Uddhav Thackeray (HT)

Ashish Shelar : सगळे गेले फक्त असरानी उरलेत; शोलेतील डायलॉगबाजी करत शेलारांचा ठाकरेंवर पलटवार

06 March 2023, 15:42 ISTAtik Sikandar Shaikh

Ashish Shelar News : मेघालयात भाजप कॉनराड संगमा यांचं काय चाटत आहे?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना केला होता. त्यानंतर आता भाजपनं ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Ashish Shelar On Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीच्या खेडमधील शिवगर्जना सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली होती. आम्हाला देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडून हातात देईन, असं म्हणत ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना सुनावलं होतं. याशिवाय मेघालयात भाजप कॉनराड संगमा यांचं काय चाटत आहे?, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता त्यावर मुंबई भाजपाध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी शेलक्या शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. याशिवाय शेलार यांनी ठाकरेंची तुलना शोले चित्रपटातील जेलरशी केल्यामुळं आता यावरून भाजपा आणि ठाकरे गटात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आशिष शेलार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, अर्धे इकडे गेलेत अर्धे तिकडे गेलेत, आता एकटे असरानी उरले आहेत. आता हे असरानी महाराष्ट्रात जिथे-जिथे फिरतील तिथं तुफान मनोरंजन होणार आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेतील आरोपांना शेलक्या शब्दांत उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून ठाकरेंनी महाराष्ट्रात मतं मिळवली आणि त्यानंतर गद्दारी केली. तेच ठाकरे आज मोदींच्या फोटोवरून आम्हाला आव्हान देतात, कोकणात शिमगा असल्यानं जनता त्यांना फारसं गांभीर्यानं घेणार नाही, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र सोडलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खेडमध्ये सभा...

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटानं शक्तिप्रदर्शन करत शिवगर्जना सभा घेतल्यानंतर आता येत्या १९ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खेडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. यावेळी रामदास कदम हे मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत ठाकरे गटाच्या सभेला उत्तर देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असून नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत.