मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bharat Jodo Yatra : ‘भारत जोडो’ यात्रेत भ्रष्टाचाराचा पैसा, खर्चाची चौकशी करावी; बावनकुळेंची मागणी

Bharat Jodo Yatra : ‘भारत जोडो’ यात्रेत भ्रष्टाचाराचा पैसा, खर्चाची चौकशी करावी; बावनकुळेंची मागणी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 08, 2022 07:22 PM IST

BJP on Bharat jodo yatra : भारत जोडो यात्रेवर भ्रष्टाचाराचा पैसा खर्च केला जात असून याची चौकशी करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळेंची भारत जोडो यात्रेवर टीका
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळेंची भारत जोडो यात्रेवर टीका

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरू आहे. सोमवारी ही यात्रा तेलंगाणामार्गे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दाखल झाली. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होताच भाजपकडून यावर टीका सुरू झाली आहे. राहुल गांधींच्या या'भारत जोडो  यात्रेत महाविकास आघाडीच्या सत्ताकाळातील भ्रष्टाचाराचा पैसा वापरला जात असून या यात्रेत काँग्रेसच्या अधिकृत खात्यातून खर्च केला जात नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच या यात्रेवर केल्या जाणाऱ्या खर्चाची रीतसर चौकशी करण्याची मागणीही बावनकुळे यांनी केली आहे.

काल (सोमवार) रात्री राहुल गांधी यांची'भारत जोडो'पदयात्रा महाराष्ट्रात दाखल झाली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून आज सकाळी देगलूरमधून पदयात्रेला सुरुवात झाली. या यात्रेवर भाजपने आक्षेप घेतला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, यात्रेत खर्च होणारा पैसा कुठून आला, कोण इतका खर्च करत आहे, याची चौकशी करण्याची गरज आहे.

काँग्रेसच्या अधिकृत खात्यातून किती पैसे खर्च होतात आणि यात्रेवर प्रत्यक्षात किती खर्च होतोय, याचा तपास झाला पाहिजे. तसेच'भारत जोडो' यात्रेत लोक स्वत: हून येत नसून त्यांना आणले जात आहे. ही यात्रा नेत्यांनी हायजॅक केली आहे. ज्या जिल्ह्यातून यात्रा जाते, त्या जिल्ह्यातील नेत्यांच्या मुलांना पुढे प्रमोट केले जात असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या