मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena Vs BJP: उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यानंतर दादरमध्ये भाजपची पोस्टर्स अज्ञातांनी फाडली

Shivsena Vs BJP: उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यानंतर दादरमध्ये भाजपची पोस्टर्स अज्ञातांनी फाडली

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 06, 2022 10:26 AM IST

Shivsena Vs BJP: दादर परिसरात भाजपचे पोस्टर्स लावण्यात आले होते. ते शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर फाडण्यात आल्याचं दिसून आलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यानंतर दादरमध्ये भाजपची पोस्टर्स अज्ञातांनी फाडली
उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यानंतर दादरमध्ये भाजपची पोस्टर्स अज्ञातांनी फाडली

Shivsena Vs BJP: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दसरा मेळावे काल मुंबईत झाले. या मेळाव्यांना मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तरही दिलं. दरम्यान, शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यानंतर दादरमध्ये भाजपचे पोस्टर्स फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

दादर परिसरात भाजपचे पोस्टर्स लावण्यात आले होते. ते शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर फाडण्यात आल्याचं दिसून आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांचे पोस्टर्स फाडले आहेत. हे पोस्टर्स कुणी फाडले या प्रकरणाची चौकशी पोलिस करत आहेत. शिवाजी पार्कपासून एक ते दोन किमी अंतरावर असलेले हे पोस्टर्स फाडल्याचं आढळलं आहे.

शिवाजी पार्कवर झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर ही पोस्टर्स फाडण्यात आली आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी हे केलं असावं अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अद्याप पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरेंचा शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री शिंदेंचा बीकेसी मैदानात दसरा मेळावा झाला.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या