Bird Flu in Maharashtra: लातूरमधील उदगीर शहरामध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कावळे मरुन पडण्याच्या घटना वाढल्या होत्या. प्रशासनाने याची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लू मुळे झाल्याहे निष्पन्न झालं आहे. त्यामुळे लातूर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ज्या परिसरात कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्य ठिकाणी १० किमी क्षेत्र हे ‘अलर्ट झोन’ घोषित करण्यात आले आहे. या परिसरातील कुक्कुटपालन करणाऱ्यांचे सर्वेक्षण केलं जाणार आहे. तसेच त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.
उदगीमध्ये कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या बाबत भोपाळ वैद्यकीय प्रयोग शाळेने अहवाल दिला आहे. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने पावले उचल्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय व पाण्याची टाकी येथील १० किमी परिसर अलर्ट झोन घोषित केला असून येथील पक्षांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जाणार आहे. या सोबतच नागरिकांच्या व प्राण्यांच्या हालचाली व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. या परिसरात कुक्कुट पालन होत असल्यास येथील पक्षाचे नमुने देखील तपासले जाणार आहे.
शहरात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात कावळ्यांचा मृत्यू झाला होता. प्रामुख्याने महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक परिसर व शहर पोलीस ठाण्याचा आवारात हे कावळे मरून पडले होते. या कडे आधी दुर्लक्ष करण्यात आलं. मात्र, यानंतर मृत कावळ्यांची संख्या वाढल्याने लातूरमधील पशु वैद्यकीय विभागाने या कावळ्यांचे मृतदेह गोळा करुन त्यांची तपासणी करण्यासाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले. मृत कावळ्यांची मान वाकडी होती. एखाद्या व्यक्तिचा तोल गेल्यावर पडल्या प्रमाणे हे कावळे जमिनीवर पडत होते.
संबंधित बातम्या