Nashik: नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे चिरला गेला दुचाकीस्वाराचा गळा, ४० टाके पडले! पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik: नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे चिरला गेला दुचाकीस्वाराचा गळा, ४० टाके पडले! पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

Nashik: नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे चिरला गेला दुचाकीस्वाराचा गळा, ४० टाके पडले! पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

Jan 09, 2025 05:59 PM IST

Biker Injured By Kites Nylon Manja In Nashik: नाशिकमध्ये नायलॉनच्या मांजामुळे एका दुचाकीस्वारचा गळा चिरल्याची घटना घडली.

नाशिक: नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वारचा चिरला गळा
नाशिक: नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वारचा चिरला गळा

Nashik News: नाशिकच्या वडाळ नाका येथे नायलॉनच्या मांजाने एका दुचाकीस्वारचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत दुचाकीस्वार थोडक्यात बचावला असून त्याच्या गळ्याला ४० टाके पडल्याची माहिती समोर येत आहे. दुचाकीस्वारवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मकरसंक्रात जवळ आली की, पतंग उडवणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढते. मात्र, हा नायलॉनचा मांजा जीवघेणा ठरू शकतो. यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहे.

मुशरन मोहसीन सय्यद असे नायलॉनच्या मांजामुळे जखमी झालेल्या दुचाकीस्वारचे नाव आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुशरन हा मेनरोड येथील कापड दुकानात काम करतो. तो काल सायंकाळी दुचाकीने वडाळा नाका परिसरात जात असताना नायलॉनचा मांजा त्याच्या गळ्यात अडकला. या घटनेत गंभीर जखमी झालेला मुशरन जमीनीवर कोसळला. त्यानंतर नागरिकांनी त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. क्टरांनी तत्काळ उपचार करत गळ्याला ४० टाके घातले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मुशरनच्या गळ्याला एकूण ४० टाके पडले आहेत, म्हणजेच थोडक्यात त्याचा जीव वाचला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

नाशिक पोलीस अलर्ट मोडवर

मकरसंक्रांतीला शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंग उडवल्या जातात. येत्या १४ जानेवारीला मकरसंक्रात साजरी केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस अलर्ट झाले असून नायलॉनचा मांजा विकणाऱ्यांविरोधात त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाईला सुरुवात केली आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यात ३४ गुन्हे दाखल करून ३९ जणांना अटक केली आहे. तर, मांजा खरेदी व विक्रीसह तो वापरात आणणाऱ्या जवळपास ७५ संशयितांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली.

नायलॉनचा मांजा खरेदी किंवा विक्रीस बंदी

राज्यात नायलॉनचा मांजा खरेदी किंवा विक्रीस बंदी आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती, संस्था पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ चे कलम १५ मध्ये नमूद शास्तीस पात्र असतील. मात्र, तरीही राज्यभरात अनेक ठिकाणी नायलॉनच्या मांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर