Bike and Crane Accident in Mumbai : मुंबईत घाटकोपर येथे भीषण अपघात घडला आहे. येथील रमाबाई ब्रीजवर शेजारून जाणाऱ्या दुचाकीवर क्रेन उलटली असून या अपघात दुचाकीचालकाचे दोन्ही पाय हे धडापासून वेगळे झाले आहे. तर क्रेन रस्त्यात आडवी झाल्याने या मार्गावरील वाहतूक ही गेल्या ६ तासांपासून ठप्प झाली आहे. गंभीर जखमी दुचाकीस्वाराची प्रकृती ही गंभीर आहे. त्याला तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. या रस्त्यावर पटली झालेली क्रेन व ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सध्या घाटकोपर ब्रीज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनसुयर घाटकोपरमध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर एक क्रेन ही एका मोठ्या ट्रेलरवर लोड करून अलिबागवरून भांडूपच्या दिशेनं नेली जात होती. हा ट्रेलर रमाबाई ब्रीज परिसरात आल्यानंतर क्रेनचा दोर तुटल्याने ही क्रेन रस्त्यावर कोसळली. यावेळी एक दुचाकीस्वार या ट्रेलरच्या बाजूने जात होता. त्यावेळी ही क्रेन त्याच्या अंगावर कोसळली. यात त्याचे दोन्ही पाय धडपासून वेगळे झाले.
मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रेलर ब्रीज उतरत असताना क्रेनला बांधलेला दोर तुटला व क्रेन रस्त्यावर उलटली. दरम्यान, याच वेळी एक तरुण हा त्याच्या दुचाकीवरून जात होता. यावेळी क्रेन त्याच्या दुचाकीवर कोसळली. या घटनेत दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. तर अपघातग्रस्त तरुणाचे पाय धडापासून वेगळे झाले आहेत. त्याला, जवळच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
हा अपघात झाल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जवळपास ६ तासांपासून येथील वाहतूक ही ठप्प झाली आहे. घाटकोपर ब्रीज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. येथील वाहतूक ही सर्व्हिस रोडने वळवण्यात आली आहे. ही क्रेन बाजूला करण्याचे काम सुरू आहे. पोलिस आणि इतर अधिकारी दुसऱ्या क्रेनच्या साह्याने ही क्रेन बाजूला करत आहे. यानंतर येथील वाहतूक सुरुळीत होणार आहे.
संबंधित बातम्या