Bihar Crime: बिहारमधील नालंदामध्ये येथून एक खळबळजनक घटना समोर आली. विवाहबाह्य संबंधातून एका व्यक्तीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह गावापासून दोन किलोमीटर अंतरावर नेऊन निर्जनस्थळी पुरला. आरोपीचे त्याची मावस मेहुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. परंतु, त्याची पत्नी प्रेमसंबंधात अडथळा ठरत होती. आरोपीने पत्नीची हत्या केल्यानंतर ती बेपत्ता असल्याची जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, मृताच्या नातेवाईकांनी आरोपीला बेदम मारहाण केली असता त्याने हत्येची कबूली दिली.
अर्निका कुमारी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, दीनानाथ कुमार असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने पोलिसांना तपासात योग्य सहकार्य न केल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. मात्र, कोणताही ठोस पुरावा मिळू शकला नाही. सोमवारी मृत महिलेचे नातेवाईक तिचा शोध घेत आरोपीच्या घरी पोहोचले. यानंतर त्यांनी आरोपी आणि त्याच्या भावाला अमानुष मारहाण केली. त्यावेळी आरोपीने पत्नीच्या हत्येची कबूली दिली. आरोपीने महिलेची हत्या करून तिचा मृतदेह दीपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समस्ती गावात पुरल्याची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या भावाला अटक करून जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
अर्निकाच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार,अर्निकाचे लग्न दीननाथसोबत मोठ्या थाटामाटात झाले. लग्नानंतर दीन दानाथचे त्याच्या चुलत बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. याबाबत दीनानाथची समजूत देखील काढण्यात आली. मात्र, तरीही त्याचे मावस मेहुणीसोबतचे प्रेमसंबंधत सुरूच होते. गेल्या ३ जून २०२४ पासून अर्निका बेपत्ता होती.खूप शोधाशोध करूनही तिचा काही पत्ता लागत नव्हता. परंतु, मावस बहिण बेपत्ता असल्याने आम्हाला आरोपीवर संशय आला. आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने स्पष्ट माहिती नसल्याचे सांगितले.
आरोपीने स्वत:ला वाचवण्यासाठी पोलिसांत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र, सोमवारी जेव्हा अर्निकाच्या नातेवाईकांनी त्याला अमानुष मारहाण केली, तेव्हा त्याने हत्येची कबूली दिली आणि अर्निकाच्या मृतदेहाचा पत्ता सांगितला. आरोपीने त्याच्या मावस मेहुणीच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याचे सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी आणि मृत महिलेचा दीड महिन्यापूर्वीच विवाह झाला होता.
संबंधित बातम्या