काँग्रेस नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना पुण्यातील न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी हे जामीनदार म्हणून न्यायालयात हजर झाले. राहुल गांधी यांची बाजू मांडणारे वकील मिलिंद पवार म्हणाले की, न्यायालयाने काँग्रेस नेत्याला न्यायालयात हजर राहण्यापासून कायमची सूट दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता १८ फेब्रुवारीला होणार आहे, असे पवार यांनी सांगितले.
सावरकरांच्या नातवाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून मार्च २०२३ मध्ये गांधीजींनी लंडनमध्ये केलेल्या भाषणाशी संबंधित आहे. आपल्या भाषणात गांधींनी स्वातंत्र्यसैनिकांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचा उल्लेख केला आणि त्यांच्यावर काही भाष्य केले होते.
राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता या खटल्याच्या सुनावणीसाठी राहूल गांधींनी उपस्थित रहावे यासाठी त्यांना न्यायालयाकडून वारंवार समन्स बजावण्यात आले होते. अखेर आज राहूल गांधी या खटल्याच्या सुनावणीवेळी व्हिडीओ कॉन्फरीन्सींग द्वारे न्यायालयासमोर आले.
मार्च २०२३ मध्ये राहूल गांधी इंग्लंड दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात त्यांनी सावरकारांवर जोरदार टीका केली होती. सावरकरांचे पाच सहा मित्र एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण करत होते आणि ते पासून सावरकरांना आनंद होत होता, असं सावरकरांनीच त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवल्याचा दावा राहूल गांधींनी केला होता. राहुल गांधी यांच्या विधानाविरोधात सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील सत्र न्यायालयात खटला दाखल आहे. या प्रकरणात राहुल गांधी यांना जामीन मंजूर झाला आहे.
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाने राहुल गांधींना १९ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र राहुल गांधी अनुपस्थितीत राहिल्यामुळे कोर्टाने त्यांना समन्स बजावत पुन्हा न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी आज ऑनलाईन उपस्थिती दर्शवत आपली बाजू मांडली.
दरम्यान, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून नेहमी वाद निर्माण होत असतो. राहुल गांधी सावरकरांनी माफीवीर संबोधतात. त्यामुळे राहुल गांधी सावरकरांचा अपमान करत असल्याचा आरोप करत भाजपने अनेकदा आंदोलने केली आहेत. अनेक सभात तसेच भारत जोडो यात्रेतही त्यांनी सावरकरांवर निशाणा साधला होता. त्याचबरोबर आरएसएसवर टीका केल्याने राहुल गांधी यांच्यावर भिवंडी न्यायालयातही खटला सुरू आहे.
संबंधित बातम्या