Nagpur : सैन्यासाठी स्फोटके बनविणाऱ्या सोलर कंपनीवर सायबर हल्ला; संवेदनशील माहितीची चोरी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur : सैन्यासाठी स्फोटके बनविणाऱ्या सोलर कंपनीवर सायबर हल्ला; संवेदनशील माहितीची चोरी

Nagpur : सैन्यासाठी स्फोटके बनविणाऱ्या सोलर कंपनीवर सायबर हल्ला; संवेदनशील माहितीची चोरी

Updated Feb 02, 2023 09:56 AM IST

cyber attack on Nagpur solar defence company : लष्करासाठी स्फोटके बनवणाऱ्या नागपुरातील सोलर कंपनीवर सायबर अटॅक झाल्याने खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेत याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे.

cyber attack
cyber attack (HT)

नागपूर : संरक्षण उत्पादनात देशातील आघाडीची कंपनी असलेली नागपुरातील सोलर ग्रुपवर सायबर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. एका अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला. यात कंपनीची संवेदनशील माहिती चोरली असल्याची शक्यता असून खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीचे संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. या प्रकरणी सायबर सेलने गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, हा हल्ला गेल्या आठवड्यात झाला.‘ब्लॅक कॅट’ नावाच्या नावाच्या हॅकर्स ग्रुपने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात कंपनीची संरक्षण विषयक माहिती आणि काही आराखड्यांचा समावेश आहे. ही घटना कळताच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यची माहिती ही पोलिसांना दिली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात आमच्याकडे तक्रार आल्याचे सांगत सायबर सेल पथकाकडून तपास सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.

लष्करी उत्पादनातील सोलर ग्रुप प्रमुख कंपनी

सोलर ग्रुपकडून भारतीय सैन्यासाठीदेखील ‘मल्टीमोड ग्रेनेड्स’ बनविले जातात. ही देशातील आघाडीची कंपनी आहे. या सोबतच लष्कराला लागणारे अनेक संवेनशील उपकरणांची देखील ही कंपनी निर्मिती करते.

‘सीबीआय’ करणार तपास ?

संरक्षण दलाचे अधिकारी व नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांचीदेखील बैठक झाली असून या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, कंपनीचा अतिशय संवेदनशील डेटा हॅकर्सच्या हाती लागला असण्याची शक्यता असून या प्रकारानंतर सोलर ग्रुपचे संकेतस्थळदेखील बंद करण्यात आले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर