मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune traffic news : पुणे विद्यापीठ चौकातील कोंडी सोडवण्यासाठी वाहतुकीत मोठा बदल; अशी आहे व्यवस्था

Pune traffic news : पुणे विद्यापीठ चौकातील कोंडी सोडवण्यासाठी वाहतुकीत मोठा बदल; अशी आहे व्यवस्था

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 03, 2024 07:15 AM IST

Pune University road traffic chenges: पुणे विद्यापीठ (Pune University) चौकातील वाहतूक कोंडीचा (Pune traffic problem) प्रश्न गंभीर झाला आहे. येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे पोलिसांनी या चौकातील वाहतुकीत मोठा बदल केला आहे.

 पुणे विद्यापीठ चौकातील कोंडी सोडव्यासाठी वाहतुकीत मोठा बदल
पुणे विद्यापीठ चौकातील कोंडी सोडव्यासाठी वाहतुकीत मोठा बदल

pune university chowk traffic changes : पुणे विद्यापीठ चौकात सुरू असलेल्या मेट्रो आणि उड्डाण पुलाच्या कामामुळे येथील रास्ता अरुंद झाला असून या चौकात आणि पुणे विद्यापीत रोड आणि सेनापती बापट मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गणेशखिंड रोड, सेनापती बापट रास्ता आणि पुणे विद्यापीठ चौकात वाहतुकीत सोमवारपासून मोठा बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी या बदलानुसार जावे व सहकार्य करावे असे आवाहन पुणे वाहतूक उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.

पुणे शहर गणेशखिंड रस्त्यावर दिनांक सोमवार पासून दुपारी १२:०० वाजता पासुन वाहतूकीमध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगीक तत्वावर बदल करण्यात आला आहे.

Pune Traffic issue : पुण्यात अवजड वाहनांना 'नो एन्ट्री'! वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; वाचा

अशी आहे पर्यायायी व्यवस्था

पुणे विद्यापीठ चौकामधुन गणेशखिड रोडने सेनापती बापट रोड कडे जाणाऱ्या वाहनांसाठी सेनापली बापट रोड जंक्शन येथून उजवीकडे प्रवेश बंद राहील.

वाहनचालकांनी कॉसमॉस बँकेसमोरून यु टर्न घेवून सेनापती बापट रोड जंक्शन वरून डावीकडे वळण घेवून जावे.

शिवाजीनगर कडुन गणेशखिंड रोडवर येणाऱ्या व रेंज हिल्सकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रेंज हिल्स् कॉर्नर येथे उजवीकडे प्रवेश बंद राहील.

वाहन चालकांनी कॉसमॉस बैंकेसमोरून यु टर्न घेवून रेंज हिल्स् कॉर्नर येथून डावीकडे वळण घेवून रेंज हिल्स् कडे जावे.

Nanded Accident: बारावीचा पेपर सोडवून घरी परतताना अपघात, २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नांदेड येथील घटना

पुणे विद्यापीठ ते बाणेर कडे जाणारा बाणेर रोड हा पोलीस पेट्रोल पंपापर्यंत बफर रोड करण्यात येत आहे.

सकाळी ०७:०० ते १२:०० वा. पर्यत नमुद रस्त्यावरील वाहतूक विद्यापीठ चौकाकडे सुरू राहील, व १२:०० ते सकाळी ०७:०० वा. पर्यंत वाहतूक बाणेरकडे सुरू राहील.

सकाळी ०७:०० ते १२:०० या वेळेमध्ये पुणे विद्यापीठ चौकामधुन बाणेर कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी पाषाण रोडवरून अभिमानश्री जंक्शन मार्गे बाणेरकडे जावे.

Lok Sabha Election: ज्या खासदारांना भाजपनं तिकीट नाकारलं, ते अकार्यक्षम होते का? काँगेसचा टोला

खालील मार्गावर सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहने, ट्रक, ट्रेलर्स, कंटेनर्स यांना २४ तास प्रवेश बंद राहील.

गणेशखिंड रोडवरील चाफेकर चौक ते पुणे विद्यापीठ चौक

औध रोडवरील ब्रेमेन चौक ते पुणे विद्यापीठ चौक

बाणेर रोडवरील अभिमानश्री चौक ते पुणे विद्यापीठ चौक

पाषाण रोडवरील अभिमानश्री चौक ते पुणे विद्यापीठ चौक

भाजीपाला वाहतूक करणारे तीनचाकी पिकअप, तसेच तीनचाकी, चारचाकी मालवाहतूक करणारी सर्व प्रकारची वाहने, स्लो मुव्हींग वाहने उदा. डंपर, मिक्सर, जे.सी.बी., रोड रोलर व इतर वाहने यांना सकाळी ०८:०० ते १२:०० व १६:०० ते २२:०० वा. दरम्यान प्रवेश बंद राहील.

IPL_Entry_Point