विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेत स्वतंत्रपणे उमेदवार देण्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच, आता आगामी महापालिका निवडणुकांपूर्वीच उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. आता,महिला उपनेत्याने ठाकरेंची साथ सोडली असून लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत अनवाणी राहणार अशी शपथ घेणाऱ्या व ती तब्बल ७ वर्षे पाळणाऱ्या शिवसेना उपनेत्या आणि महिला विभाग संघटक राजुल शिवबंधन तोडले आहे. राजुल पटेल आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विधानसभेतील अपयशानंतर उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी करत आहे. पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी करत आहेत, पण दुसऱ्या बाजुला त्यांना एकापाठोपाठएक धक्के बसत आहेत. मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्यानं नाराज असलेल्याराजुल पटेलयांनी शिवबंधन तोडत हाती धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंना अनेक धक्के बसले आहेत. शिंदेच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. काही दिवसापूर्वी डोंबिवलीत ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले होते. माजी नगरसेविका संगीता पाटील यांनी समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच सावंतवाडी येथील तालुका प्रमुखाने ठाकरेंची साथ सोडली असून माजी आमदार राजन साळवी हेही ठाकरेंच साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मुंबईपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका राजुल पटेलयांनी प्रतिज्ञा घेतली होती की, जोपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनाचा मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही. त्यांनी शपथेप्रमाणे तब्बल सात वर्षे चप्पल न घालता अनवाणी फिरल्या.
संबंधित बातम्या