मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gondia: गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, दोन नगराध्यक्षांसह १२ नगरसेवक शिंदे गटात

Gondia: गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, दोन नगराध्यक्षांसह १२ नगरसेवक शिंदे गटात

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 27, 2023 12:03 AM IST

Big blow to NCP in Gondia: निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Maha Vikas Aghadi
Maha Vikas Aghadi (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Big blow to NCP in Gondia: देशात निवडणुकांचे वारे वाहत असताना महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगराध्यक्षासह १५ नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगराध्यक्ष आणि तब्बल १२ नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर, ठाकरे गटाच्या ४ विद्यमान नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते डॉ. सुगत चद्रिकापुरे यांच्या नेतृत्वाखाली सडक अर्जुनी नगर पंचायत मधील विद्यमान नगराध्यक्ष तेजराम मडावी यांच्यासह १२ विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे भाजपचे कमळ हाती घेतले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टेकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक टेकवडे २००४ ते २००९ या काळात पुरंदर हवेलीचे आमदार राहिले. या पार्श्वभूमीवर टेकवडे यांनी भाजप प्रवेश केला. तो राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग