मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Tarapur MIDC Blast: तारापुर एमआयडीसीत भीषण स्फोट; परिसरात आगीचे लोट; स्थानिक नागरिक दहशतीत

Tarapur MIDC Blast: तारापुर एमआयडीसीत भीषण स्फोट; परिसरात आगीचे लोट; स्थानिक नागरिक दहशतीत

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 17, 2024 01:52 PM IST

Tarapur MIDC Blast: तारापुर एमआयडीसीत एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या कंपनीत मोठी आग लागली असून आगीचे लोळ दूरवरुन दिसत आहेत.

Tarapur MIDC Blast
Tarapur MIDC Blast

 

Tarapur MIDC Blast: तारापुर एमआयडीसीत एका कारखान्यात दुपारी १२ च्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट एवढा भयंकर होता ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. स्फोटानंतर कारखान्यात भीषण आग लागली आहे. आगीचे लोळ दूरवरुन दिसत आहेत. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही. या स्फोटांमुळे स्थानिक नागरिकांची धापवळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पालघर-बोईसर तारापूर एमआयडीसीतील में मोल्टास कारखान्यात हा भीषण स्फोट झाला. यानंतर कारखान्यातला मोठी आग लागली. साधारण १२ च्या सुमारास ही घटना घडली. हा स्फोट एवढा भीषण होता की संपूर्ण परिसर या घटनेमुळे हादरला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सुदैवाने आता पर्यंत या घटनेत कोणतहीही जीवित हानी झाली असल्याची माहिती नाही. दरम्यान, कारखान्यात काही नागरिक अडकले असल्याही भीती व्यक्ति केली जात आहे. अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. धुराचे लोळ लांबच पसरले आहे. स्फोट होताच नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. दरम्यान, हा स्फोट कसा झाला याचा तपास कर्मचारी घेत आहे. पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग