मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit pawar : अजित पवारांच्या अडचणी वाढणार?, भाजप नेत्यानंतर माजी जलसंपदा अभियंत्याचा मोठा आरोप

Ajit pawar : अजित पवारांच्या अडचणी वाढणार?, भाजप नेत्यानंतर माजी जलसंपदा अभियंत्याचा मोठा आरोप

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 19, 2022 04:25 PM IST

सिंचन घोटाळा (irrigation scam) पहिल्यांदा उजेडात आणणाऱ्या विजय पांढरे यांनी मोठा आरोप केल्याने अजित पवारांसमोरील अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार
अजित पवार

नाशिक - सिंचन घोटाळ्याप्रकरणी (irrigation scam) अजित पवारांना (Ajit Pawar) क्लिन चीट दिल्याचा अहवाल नागपूर उच्च न्यायालयाने अद्याप स्वीकारला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्याने ट्विट करून राज्यातील सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करून राष्ट्रवादीचा मोठी लवकरच तुरुंगात जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.  मात्र याच सिंचन घोटाळ्याला नवी कलाटणी मिळाली आहे. या प्रकरण पहिल्यांदा उजेडात आणणाऱ्या विजय पांढरे (vijay pandhre) यांनी मोठा आरोप केल्याने अजित पवारांसमोरील अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. 

जलसंपदा विभागाचे माजी अभियंते विजय पांढरे (vijay pandhre) यांनी म्हटले आहे की, भाजपचे नेते मोहित कंभोज यांनी केलेलं ट्विट महत्वाचं आहे. सिंचन घोटाळ्याची मागील १० वर्षात कोणतीच चौकशी झाली नाही. सिंचन घोटाळ्याप्रकरणी केवळ चौकशीचे व कारवाईचे नाटक करण्यात आले. सिंचन घोटाळ्याची व्याप्ती मोठा आहे व याप्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मात्र, आरोपींवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यापेक्षा सिंचन घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. तसेच चितळे समितीने सर्व गोष्टी अहवालात नमूद केल्या आहेत, असेही ते म्हणाले. त्यामुळे मोहित कंबोज यांच्या पाठोपाठ विजय पांढरे यांची या प्रकरणात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

मुंबईचे तत्कालीन पोलीस अधीक्षक परमबीर सिंग यांनी नागपूर न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून अजित पवार यांना क्लिनचीट देण्यात आली होती. मात्र, खंडपीठाने तो अहवाल अद्यापही मान्य केलेला नाही.

IPL_Entry_Point