मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुणे पोलिसांची कारवाई! केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या क्लोरल हायड्रेटचा कारखाना पाडला बंद

पुणे पोलिसांची कारवाई! केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या क्लोरल हायड्रेटचा कारखाना पाडला बंद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 27, 2024 10:57 AM IST

Pune Police action at Sangamner : पुणे पोलिसांनी ड्रग्स तस्करांवर मोठी कारवाई केली होती. ही घटना ताजी असतांना आता केमिकल ताड़ी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे. या सोबतच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक कारखाना देखील उद्धवस्त केला.

पुणे शहरात केमिकल ताडी तयार करणाऱ्यांचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला.
पुणे शहरात केमिकल ताडी तयार करणाऱ्यांचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला.

Pune Police action at Sangamner : पुणे पोलिसांनी ड्रग्स तस्करांवर मोठी कारवाई केली होती. ही घटना ताजी असतांना आता केमिकल ताड़ी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे. या सोबतच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक कारखाना देखील उद्धवस्त केला.  तर तब्बल दोन हजार तीनशे किलो क्लोरल हायड्रेट पावडर (केमिकल ) जप्त करण्यात आले आहे. याची किंमत ६० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. पुणे पोलिसांनी केमिकल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे देखील जप्त केली आहे. गंभीर म्हणजे सातवी पास व्यक्ती हा कारखाना चालवित होता.

Maharashtra Weather update : राज्यात उषणेच्या झळा! तापमान ४१ पार; मार्च अखेर राज्यातील अनेक जिल्हे तापणार

निलेश विलास बांगर (वय ४०, रा- पिंपळगाव खडकी, कुरकुटे मळा, मंचर ता आंबेगाव), प्रल्हाद रंगनाथ भंडारी (वय ६१, रा केशवनगर, मुंढवा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल विक्री होत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती.

Shivaji Park : निवडणुकांच्या सभांसाठी शिवाजी पार्क फुल्ल! ठाकरे गट आणि मनसेची एकाच तारखेला मैदानाची मागणी

मुंढव्यतील आरोपी प्रल्हाद रंगनाथ भंडारी याच्या कडे विषारी बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेडचा साठा सापडला. त्याची चौकशी केली असता. हा मल त्याला आरोपी नीलेश बांगरने पुरवल्याचे तपासात पुढे आले. पुणे पोलिसांनी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खंडकी येथील त्याच्या घरावर छापा टाकून केमिकलचे १४२ किलो ७५० ग्रॅम वजनाचे ५ पोते असा २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

त्याची चौकशी केली अहमदनगर जिल्ह्यातील सांगमनेर येथील वेल्हाळे येथे बांगरने केमिकल विषारी ताडी तयार करणेसाठी वापरले जाणारे क्लोरल हायड्रेड रसायन पावडर तयार करण्याचा अवैध कारखाना थाटल्याचे पुढे आले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्य ठिकाणी जाऊन छापा टाकून २,२१७.५ किलो तयार क्लोरल हायड्रेड आणि ते तयार करणेसाठी लागणारे उपकरणे असा ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन हा अवैध कारखाना सिल केला. दोन्ही आरोर्पीना अटक करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार , सह पोलिस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सुनिल तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग