तब्बल ४५ वर्षांचा काँग्रेसचा अभेद्य गड ढासळला! भोर वेल्हा मतदारसंघात संग्राम थोपटे यांचा पराभव; अति आत्मविश्वास नडला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तब्बल ४५ वर्षांचा काँग्रेसचा अभेद्य गड ढासळला! भोर वेल्हा मतदारसंघात संग्राम थोपटे यांचा पराभव; अति आत्मविश्वास नडला

तब्बल ४५ वर्षांचा काँग्रेसचा अभेद्य गड ढासळला! भोर वेल्हा मतदारसंघात संग्राम थोपटे यांचा पराभव; अति आत्मविश्वास नडला

Nov 25, 2024 12:40 PM IST

Bhor Assembly Election Results 2024 : पुणे जिल्ह्यात अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. यात भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील निकालाने काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. तीन वेळा निवडून आलेले काँग्रेसचे संग्राम थोपटे यांचा पराभव झाला आहे.

तब्बल ४५ वर्षांचा काँग्रेसचा अभेद्य गड ढासळला! भोर वेल्हा मुळशीतून संग्राम थोपटे यांचा दारुण पराभव; अती आत्मविश्वास नडला
तब्बल ४५ वर्षांचा काँग्रेसचा अभेद्य गड ढासळला! भोर वेल्हा मुळशीतून संग्राम थोपटे यांचा दारुण पराभव; अती आत्मविश्वास नडला

Bhor Assembly Election Results 2024 : पुणे जिल्ह्यात अनेक मोठ्या लढती झाल्या. यात सर्वात लक्ष्यवेधी लढत ठरली ती भोर वेल्हा मुळशी मतदारसंघातील. गेल्या ४५ वर्षांपासून काँग्रेसचा हा अभेद्य गड ढासळला. सामान्य जिल्हा परिषद सदस्याने विजयाची हॅट्रिक करणाऱ्या व मंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या संग्राम थोपटे यांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत संग्राम थोपटे यांना अती आत्मविश्वास आणि जनतेची नाराजी भोवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर यांनी थोपटे यांचा दारुण पराभव केला.

भोर विधानसभा मतदारसंघ पुण्यातील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघात बारामती लोकसभा मतदार संघात येतो. संग्राम थोपटे यांच्या आधी त्यांचे वडील अनंतराव थोपटे ये या मतदार संघातून तब्बल ६ वेळा निवडणून आले आहेत. तब्बल ४५ वर्षापासून हा कॉँग्रेसचा गड होता. पण यावेळी महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडीचे अनेक गड ढासळले.

भोर विधानसभा मतदार संघाचा इतिहास

भोर विधानसभा मतदार संघात १९६२ व १९६७ मध्ये शंकर भेलके यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. त्यानंतर संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांनी या मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून १९७२ मध्ये निवडणूक लढवली. अनंतराव थोपटे यांनी ही निवडणूक जिंकली. येथून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. १९७८ मध्ये काँग्रेसच्या समर्थनाने सम्पतराव जेडे यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर १९८० मध्ये अनंतराव थोपटे काँग्रेसच्या तिकिटावर या मतदार संघातून निवडून आले. यानंतर अनंतराव थोपटेहे १९८५, १९९०, १९९५ आणि २००४ मध्ये या मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर संग्राम थोपटे हे २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये या मतदार संघातून निवडून आले. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

भोर विधानसभा मतदारसंघाचे मुद्दे

भोर विधानसभा मतदारसंघात विकास, सिंचन आणि ग्रामीण भागातील विकासकामे या मुद्यावर लढली गेली. हे मुद्दे आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकीत महत्वाचे ठरले.

संग्राम थोपटे यांच्या पराभवाची कारणे ?

भोर मतदार संघात ७३ टक्के मतदान झाले. या वाढलेल्या मतदानाचा फायदा थोपटे यांना झाला नाही. भोर मधील थोपटे विरोधक मोठ्या प्रमाणात एकवटले होते. विरोधकांनी एकजुटीने शंकर मांडेकर यांचा प्रचार केला. त्यामुळे थोपटे यांचा पराभव झाला. संग्राम थोपटे यांनी त्यांच्याकडे कोणतेही पद नसतांना तालुक्यात मोठी विकासकामे केली. मात्र, तरीसुद्धा त्यांना यावेळी मतदारांनी नाकारले.

शरद पवारांना दिलेल्या पाठिंब्यामुळे  निष्ठावंत नाराज

शरड पवार यांनी अनंतराव थोपटे यांचा मोठा विरोध केला होता. त्यांची मुख्यमंत्री पदाची संधी शरद पवार यांच्यामुळे गेल्याचे बोलले जात आहे. असे असतांना देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटीनंतर संग्राम थोपटे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची साथ दिली. ही बाब काँग्रेसच्या काही निष्ठावंतांना आवडले नाही. याच फटका संग्राम थोपटे यांना बसला. तसेच त्यांनी विविध सभांमधून अजित पवार यांच्यावर केलेल्या टीका देखील त्यांना भोवली. त्यामुळे त्यांना आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

राज्य सरकारची लाडकी बहीण योजना, महिलांसाठी एसटीच्या दरात पन्नास टक्के सवलत, शेतकरी सन्मान योजना, ज्येष्ठांसाठी वयश्री योजना आणि तिर्थदर्शन योजना यासारख्या योजनांमुळे महायुतीचे उमेदवार शंकर मांडकर यांना फायदा झाला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली. त्या तुलनेत भोर मधील अनेक प्रश्न थोपटे यांना सोडवता आले नाही. १५ वर्षांत भोर तालुक्यातील बेरोजगारी, सिंचनाचे प्रश्न, भोर एसटी डेपो बंद पडण्याच्या मार्गावर असूनही प्रवाशांना सेवा देण्यासाठी न केले प्रयत्न आणि बंद पडलेला राजगड सहकारी साखर कारखाना यामुळे तालुक्यातील मतदारांमध्ये नाराजी वाढली. याच फटका त्यांना बसला.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर