मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Crime : अघोरी विद्येच्या नावाखाली तरुणाचा बळी; नाशिकच्या बागलाण तालुक्यातील प्रकार, भोंदूबाबा फरार

Nashik Crime : अघोरी विद्येच्या नावाखाली तरुणाचा बळी; नाशिकच्या बागलाण तालुक्यातील प्रकार, भोंदूबाबा फरार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 18, 2023 01:37 PM IST

Nashik Crime : नाशिक येथील बागलाण तालुक्यात एक अघोरी घटना उघडकीस आली आहे. एका भोंदू बाबाने अघोरी विद्येच्या नावाखाली तरुणाचा बळी घेतला आहे.

Gondia crime news
Gondia crime news

नाशिक : पुढारलेल्या महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेच्या घटना घडत आहे. अघोरी विद्येच्या प्रकारातून एका तरुणाचा बळी घेण्यात आला आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आलियाबाद येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोंदू बाबा घटनेनंतर फरार झाला आहे.

Ajit Pawar : नव्या ‌राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा; मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही; अजित पवारांनी ठणकावले

प्रवीण गोलचंद सोनवणे असे मृत तरुणाचे नाव आहे. तर तुळशीराम सोनवणे असे संशयित भोंदू बाबाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे येथील प्रवीण सोनवणे यांची तब्येत बरी नसल्यामुळे आलियाबाद येथील भोंदू बाबाकडे गावठी उपचार करण्यासाठी जात होता. तर भोंदू बाबाचे ही पिंपळकोठे येथे सोनवणे यांच्या घरी सारखे येणे जाणे होते.

Pune Crime : पुण्यात चतुशृंगी परिसरात सराईत टोळक्याची दहशत; हातात दांडके, कोयते घेऊन २० वाहने फोडली

गेल्या आठवड्यात सोनवणे हा आलियाबाद येथे या भोंदूबाबाकडे उपचारासाठी गेला होता. यावेळी भोंदू बाबाने अघोरीपणा करून सोनवणे याचा खून केला. तसेच त्याला त्याच घरात टाकून तो फरार झाला. दरम्यान बराच वेळ होऊन देखील सोनवणे घरी न आल्याने त्याच्या घरचे चिंतेत पडले. त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी तो भोंदूबाबाकडे गेल्याची माहिती त्यांना मिळाली. नातेवाईकाने भोंदू बाबास फोन करून सोनवणे याची माहिती घेतली असता प्रवीण बाहेर गेला आहे तो झोपला आहे, अशी उत्तर दिली. दरम्यान, भोंदू बाबचा संशय आल्याने नातेवाइकांनी थेट पोलिस ठाणे गाठत याची तक्रार दिली. जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी जात भोंदू बाबाच्या घराची पाहणी केली. यावेळी त्या ठिकाणी प्रवीण सोनवणेचा मृतदेह त्यांना आढळला. त्यांचा मृतदेह येथील साल्हेर रुग्णालयात नेल्यात आला. प्रवीणचा मृत्यू नेमका कसा झाला हे समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे. भोंदूबाबा हा त्याच्या साथीदारसह फरार झाला आहे.

गावाबाहेर घडला प्रकार

पिंपळकोठे येथील प्रवीण सोनवणे याचे घर आदिवासी वस्तीवर निर्जनस्थळी आहे. या ठिकाणी येणाऱ्या जणाऱ्यांची संख्या ही कमी आहे. गावातील एक महिला भिमाबाई सोनवणे व मोतीराम सोनवणे यांना भोंदूबाबा सोनवणे यांच्या घराजवळ निळ्या रंगाच्या माशा मोठ्या प्रमाणात दिसल्याने त्यांचा संशय बळावला. त्यांनी याची माहिती पोलिस पाटील यांना दिली. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यावर भोंदू बाबाच्या घराची झडती घेण्यात आली. यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

IPL_Entry_Point

विभाग