बाबासाहेबांवरील वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनीही भाजपला घेरलं, 'त्यांची जुनी मानसिकता समोर आली...'
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बाबासाहेबांवरील वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनीही भाजपला घेरलं, 'त्यांची जुनी मानसिकता समोर आली...'

बाबासाहेबांवरील वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनीही भाजपला घेरलं, 'त्यांची जुनी मानसिकता समोर आली...'

Dec 19, 2024 01:08 PM IST

Prakash Ambedkar On Amit Shah : अमित शहा यांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. ही या लोकांची जुनी मानसिकता असून भाजप अस्तित्वात येण्यापूर्वीच जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाबासाहेबांना विरोध केला होता, असे आंबेडकर म्हणाले.

बाबासाहेबांवरील वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनीही भाजपला घेरलं, 'त्यांची जुनी मानसिकता समोर आली...'
बाबासाहेबांवरील वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनीही भाजपला घेरलं, 'त्यांची जुनी मानसिकता समोर आली...'

Prakash Ambedkar On Amit Shah : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून खळबळ उडाली आहे. काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. तर संसदेत देखील मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही अमित शहा यांच्या विधानवरून त्यांचा समाचार घेतला आहे. यांची जुनी मानसिकता समोर आली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. भाजप अस्तित्वात येण्यापूर्वीच जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाबासाहेबांना विरोध केला होता. राज्यघटना स्वीकारली जात असताना हा विरोध करण्यात आला होता.

राज्यसभेत भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद उफाळून आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनीदेखील अमित शाहांवर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, शाह यांच्या वक्तव्यातून भाजपचा जळफळाट बाहेर पडला आहे. हे लोक तेव्हाही यशस्वी झाले नाहीत आणि आजही यशस्वी होणार नाहीत. भाजपची ही भूमिका नवीन नाही. त्यांना त्यांच्या जुन्या अजेंडे राबविता आले नाहीत. याचे कारण काँग्रेस नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे लोक भविष्यात यशस्वी होणार नाहीत. भाजप पक्ष जेव्हा अस्तित्वात नव्हता तेव्हा जनसंघ होता. आरएसएस होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वात जास्त याच संघटनांनी विरोध केला. अमित शाह यांनी केलेलं वक्तव्य ही भाजपची जुनी मानसिकता आहेत. ती आता पुन्हा दिसून आली आहे. त्यात नवीन असं काही नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद थांबलेला नाही. काँग्रेसने अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर लालू यादव म्हणतात की, शहा यांनी राजकारणातून बाहेर पडावे अशी मागणी केली आहे.

काय म्हणाले अमित शहा ?

अमित शहा म्हणाले होते की, आजकाल आंबेडकर-आंबेडकर म्हणण्याची फॅशन झाली आहे. जर त्या ऐवजी देवाचे नाव घेतले असते तर त्यांना सात जन्मांसाठी स्वर्ग प्राप्त झाला असता. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या या व्यक्तव्याचा निषेध केला. देवाचे नाव घेणे म्हणजे एकप्रकारे मनुवाद स्वीकारण्यासारखा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी परभणीतील हिंसाचाराचा मुद्दाही उपस्थित केला. तेथे मारल्या गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

Whats_app_banner