मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhima Koregaon: सामाजिक कार्यकर्ते व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा ५ वर्षानंतर तळोजा जेलमधून बाहेर

Bhima Koregaon: सामाजिक कार्यकर्ते व्हर्नन गोन्साल्वीस, अरुण फरेरा ५ वर्षानंतर तळोजा जेलमधून बाहेर

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Aug 05, 2023 04:42 PM IST

Social worker Vernon Gonsalves, Arun Ferreira released from jail- सामाजित कार्यकर्ते व्हर्नन गोन्साल्वीस आणि अरुण परेरा आज शनिवारी जेलमधून बाहेर आले. या दोघांनाही सुप्रीम कोर्टाने २८ जुलै रोजी जामीन दिला होता.

Social worker Vernon Gonsalves,  Arun Ferreira released from jail
Social worker Vernon Gonsalves, Arun Ferreira released from jail

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवार वाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेनंतर भीमा-कोरेगाव परिसरात उफाळलेल्या हिंसाचार प्रकरणात बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा Unlawful Activities (Prevention) Act अंतर्गत अटकेत असलेले सामाजित कार्यकर्ते व्हर्नन गोन्साल्वीस आणि अरुण परेरा आज शनिवारी जेलमधून बाहेर आले. या दोघांनाही सुप्रीम कोर्टाने २८ जुलै रोजी जामीन दिला होता. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर आज गोन्साल्विस आणि फरेरा या दोघांची नवी मुंबईतील तळोजा येथील कारागृहातून सुटका करण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

प्रकरण काय आहे?

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद ही सामाजिक विषयावर राष्ट्रीय परिषद पार पडली होती. त्यानंतर १ जानेवारी २०१८ रोजी पुण्याजवळ भीमा-कोरेगाव येथे जमावाकडून हिंसाचार घडला होता. या हिंसाचारामध्ये एकाचा मृत्यू झाला होता तर काही जण जखमी झाले होते. भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते व्हर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा या दोघांना अटक केली होती. २०१८ पासून ते तुरुंगात होते. 

मुंबई उच्च न्यायालयाने गोन्साल्विस आणि फरेरा यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दोघांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. २८ जुलै रोजी गोन्साल्विस आणि फरेरा या दोघांना जामीन देताना सुप्रीम कोर्टाने काही अटी घालून दिल्या आहेत. त्यांना राष्ट्रीय तपास संस्था तसेच पोलिसांनी बोलावल्यानंतर जाऊन सहकार्य करणे आवश्यक आहे. तसेच पोलिसांकडे पासपोर्ट जमा करावा लागणार आहे. अशाच प्रकरणात गोन्साल्विस आणि फरेरा यांच्या सहआरोपी सुधा भारद्वाज यांना मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी जामीन दिला होता. या प्रकरणाचा युक्तिवाद या दोघांनी सुप्रीम कोर्टात केला होता.

 

WhatsApp channel