Mumbai News: मुंबईतील एका तरुणीने दावा केला आहे की, 'रॅपिडो' ड्रायव्हरने तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिला धमकावले. ओशिन भट्ट नावाच्या एका तरुणीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. ओशिनने रॅपिडोवर इकॉनॉमी कार कशी बुक केली, पण तिला प्रीमियम कार मिळाली. पण चालकाने तिच्याकडे अधिक पैशांची मागणी केली. परंतु, तरुणीने नकार दिल्या. मात्र , त्यानंतर चालकाने शिवीगाळ आणि अपशब्द वापरले. प्रकरण चिघळल्यानंतर रॅपिडोने संबंधित कार चालकाविरोधात कारवाई केली.
ओशिनने रॅपिडो ड्रायव्हरशी झालेल्या संवादाचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला, ज्यात तुमचा कॉल कनेक्ट होत नाही, असा रॅपिडो चालक मेसेज करतो. मात्र, त्यानंतर तो अत्यंत घाणेरडा मॅसेज करतो आणि संबंधित तरुणीला भिखारी की औलाद, असे बोलतो. यावर तरुणी हसायचा इमोजी पाठवते. ज्याच्या उत्तरात रॅपिडो चालक बोलतो की, स्वस्त हवे आहे तर, चालत जा. यावर तरुणी ब्रो असे लिहून पुन्हा हसायचे इमोजो पाठवले. यानंतर तरुणीने उबेर बूक केली आणि तिथून निघून गेली. त्यानंतर रॅपिडो ड्रायव्हरने स्वत: च राइड रद्द केली.
ओशिनची एक्सवरील पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टवर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. आतापर्यंत जवळपास १५ लाख लोकांनी हो पोस्ट पाहले वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. एका युजरने लिहिले की, असाच एक प्रसंग माझ्यासोबत घडला, पण हे चॅट रॅपिडो कस्टमर केअर टीमने केले. एकाने लिहिले की, त्या ड्रायव्हरचे नाव काय आहे सागंतिल
या घटनेवर रॅपिडोने प्रतिक्रिया दिली आहे. यासंबंधित कारवाई करण्यासाठी रॅपिडो चालकाची माहिती मागितली आहे. 'आम्हाला हे प्रकरण त्वरीत सोडविण्यास आणि योग्य कार्यवाही सुनिश्चित करण्यात मदत करण्यासाठी, आम्ही आपल्याला नम्र विनंती करतो की कृपया आपला नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा राइड आयडी डीएमद्वारे सामायिक करा.' आपल्या नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान रॅपिडो चालकाच्या गैरवर्तनामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही माफी मागतो. नुकतेच समजलेल्या माहितीनुसार, रॅपिडो कंपनीने संबंधित व्यक्तील कामावरू काढून टाकले आहे.