मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जीवे मारण्याची धमकी देत पोटच्या मुलीवर वारंवार अत्याचार, भाईंदर येथील धक्कादायक घटना

जीवे मारण्याची धमकी देत पोटच्या मुलीवर वारंवार अत्याचार, भाईंदर येथील धक्कादायक घटना

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 01, 2024 05:03 PM IST

Bhayandar Man Rapes Daughter: भाईंदर येथील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोटच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली.

Rape (Representative Image)
Rape (Representative Image) (HT)

Bhayandar Rape News In Marathi: भाईंदर येथील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाप- लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली. १४ वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देत जन्मदात्या पित्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार मोठ्या बहिणीला सांगितल्यानंतर आरोपी पित्याचे लज्जास्पद कृत्य उजेडात आले. याप्रकरणी नवघर पोलिसांनी नराधम पित्याला बेड्या ठोकल्या असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून पीडिताला धमकावत तिच्यावर बलात्कार करत होता. पीडिता घरी एकटी असताना आरोपी तिचा गैरफायदा घेत असे. पीडिताने विरोध केल्यास आरोपी तर तो तिला बेदम मारहाण करायचा. शारिरिक आणि मानसिक त्रासाला वैतागून पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या मोठ्या बहिणीच्या कानावर घातला. यानंतर पीडिताच्या मोठ्या बहिणीने शनिवारी आरोपी पित्याविरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पीडिता रात्री झोपेत असताना आरोपी पित्याने दोन तीन वेळा तिच्या छातीला स्पर्श केला. तसेच याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने अनेकदा तिच्यावर अत्याचार केले.

पीडिताच्या फिर्यादीवरून पोलिसानी आरोपी पित्याला अटक केली आहे. तसेच त्याच्याविरोधात पोस्को कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली.

मुंबई: संपत्ती विकण्याच्या वादातून पत्नीची हत्या

मुंबईच्या बांगनूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संपत्ती विकण्याच्या वादातून पत्नीची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर आरोपी हा फरार झाला आहे. या प्रकरणी बांगनूरनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. चित्रा ड्रेसन डिसा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

WhatsApp channel

विभाग