मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhavna Gawali : 'कालपर्यंत मी त्यांची ताई होते आज बाई झाले', उद्धव ठाकरेंवर भावना गवळींचा पलटवार
उद्धव ठाकरेंवर भावना गवळींचा पलटवार
उद्धव ठाकरेंवर भावना गवळींचा पलटवार

Bhavna Gawali : 'कालपर्यंत मी त्यांची ताई होते आज बाई झाले', उद्धव ठाकरेंवर भावना गवळींचा पलटवार

22 September 2022, 23:17 ISTShrikant Ashok Londhe

भावना गवळी यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली होती. त्याच गोष्टीवरुन उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात निशाणा साधला होता. ठाकरेंच्या या टीकेवर भावना गवळी (Bhavna Gawali) यांनी प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, कालपर्यंत मी त्यांची ताई होते आज बाई झाले.

वाशिम -शिवसेनेचा गटप्रमुख मेळावा गोरेगावात बुधवारी पार पडला. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांनी जोरदार भाषण करत भाजप व बंडखोरांवर निशाणा साधला. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेबरोबरच वाशिम -बुलडाण्याच्या खासदार भावना गवळी (mp bhavna gawali) यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

ट्रेंडिंग न्यूज

भावना गवळी यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली होती. त्याच गोष्टीवरुन उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात निशाणा साधला होता. ठाकरेंच्या या टीकेवर भावना गवळी यांनी प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, कालपर्यंत मी त्यांची ताई होते आज बाई झाले.

उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाबाबत विचारले असता भावना गवळी म्हणाल्या की, बहिण-भावाच्या पवित्र नात्यावरराग काढू नये.राजकारणात राग काढायला अनेक जागा आहेत. मी अनेक मंत्र्यांना राख्या पाठवल्या वबांधल्या. मी माझ्या मतदारसंघातील सामान्य कार्यकर्त्यांपासून देशाच्या पंतप्रधानांपर्यंत राखी बांधली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनासुद्धा मी राखी बांधलेली आहे. हे भावाबहिणीचं नातं आहे. ते असंच पवित्र ठेवूयात",असं भावना गवळी म्हणाल्या.

उद्धव ठाकरेंचे विधान नैराश्येतून -

रक्षाबंधन सारख्या पवित्र नात्याचं कुणीही राजकारण करू नये. काल मी उद्धव ठाकरे यांची ताई होती आज बाई झाले. मी मागील अनेक वर्षांपासून माझ्या मतदारसंघातील एक लाखा पेक्षा जास्त भावांना राख्या पाठवते. या आधीही मी अनेक मंत्री,माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही राखी बांधली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला संकटकाळी मदत केली म्हणून मी त्यांची साथ दिली. उद्धव साहेब नैराश्यातून असे विधानं करत आहेत,असा टोलाही भावना गवळी यांनी लगावला.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे -

पंतप्रधानांना राखी बांधायला संपूर्ण देशात अशी बाई मिळाली, ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केले होते. अशांना पक्षामध्ये घेऊन त्यांना क्लीन चीट देत सुटले आहात. अहो तुमच्या आजूबाजूला बसले आहेत त्यांना तुम्हीच भ्रष्टाचारी म्हणून बदनाम करुन टाकलेलं आहे. मला पंतप्रधानांचं सुद्धा आश्चर्य वाटतं. स्वतःच्या पक्षातील माणसांनी ज्या महिला खासदारावर आरोप केले, भ्रष्टाचारी म्हणून संबोधलं, तुम्हाला सव्वा काय दीड कोटी जनतेतून हीच बहिण मिळाली राखी बांधायला?,अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.