मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bharat Jodo: सोनिया गांधी शेगावला येणार; शरद पवार, उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण

Bharat Jodo: सोनिया गांधी शेगावला येणार; शरद पवार, उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Nov 15, 2022 10:38 AM IST

Bharat Jodo: शेगावमधील या सभेला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.

Bharat Jodo: शेगावला येणार सोनिया गांधी; शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण
Bharat Jodo: शेगावला येणार सोनिया गांधी; शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण (AICC)

Bharat Jodo: काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेच्या निमित्ताने शेगावमध्ये राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी याबाबतचे संकेत दिले. शेगावमधील या सभेला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.

भारत जोडो यात्रेतील शेगावच्या सभेत जर शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास भाजपचे विरोधक एका मंचावर यानिमित्ताने दिसतील. महाविकास आघीड सरकार कोसळल्यानंतरही तिन्ही पक्ष एकमेकांसोबत असल्याचं दिसतं. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत याआधी राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे नेतेही सहभागी झाले होते.

आजचा भारत जोडो यात्रेतला दुपारचा मुक्काम बोराळा हिस्से इथं असणार आहे. यावेळी राहुल गांधी हे बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी समजाबांधवांसोबत साजरी करणार आहेत. यानंतर वाशीम पोलिस स्टेशन चौकात कॉर्नर मिटींग होणार आहे. तसंच आजचा मुक्काम रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात असणार आहे. बुधवारी यात्रा मालेगावच्या दिशेने रवाना होणार आहे. तर १७ नोव्हेंबरला बाळापूरच्या दिशेने निघेल.

भारत जोडो यात्रेने मंगळवारी मराठवाड्यातून विदर्भात प्रवेश केला. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कनेरगावाजवळ लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारली होती.

IPL_Entry_Point