मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rahul Gandhi speech : मोदींनी २२ उद्योगपतींचं १६ लाख कोटींचं कर्ज माफ केलं; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

Rahul Gandhi speech : मोदींनी २२ उद्योगपतींचं १६ लाख कोटींचं कर्ज माफ केलं; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 12, 2024 07:05 PM IST

Rahul Gandhi Nandurbar Rally Speech : भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्तानं नंदूरबारमध्ये झालेल्या जाहीर सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार तोफ डागली.

मोदींनी २२ उद्योगपतींचं १६ लाख कोटींचं कर्ज माफ केलं; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
मोदींनी २२ उद्योगपतींचं १६ लाख कोटींचं कर्ज माफ केलं; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

Rahul Gandhi allegations on PM Narendra Modi : 'मनरेगावर २४ वर्षांत जेवढा खर्च केला जातो, तेवढ्या रकमेचे म्हणजे तब्बल १६ लाख कोटींचं २२ उद्योगपतींचं कर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं माफ केलं, पण आदिवासी, गरिबांचा एक रुपयाही माफ केला नाही, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केला.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) महाराष्ट्रात आली आहे. यात्रेच्या निमित्तानं नंदूरबारमध्ये आज राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 

आदिवसी देशाचे खरे मालक

'देशाच्या खऱ्या मालकांना, म्हणजेच आदिवासींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जात आहे. या देशातील जल, जंगल व जमिनीवर पहिला हक्क आदिवासींचा आहे परंतु भाजप आदिवासींना वनवासी म्हणून हक्कापासून वंचित ठेवत आहे. भाजप सरकार दलित, आदिवासींची जमीन ताब्यात घेऊन अदानीला देत आहे, असा आरोप राहुल यांनी केला.

'काँग्रेस पक्ष आदिवासींच्या हक्काचं रक्षण करणारा आहे. देशात आदिवासींची ८ टक्के लोकसंख्या आहे, पण त्या प्रमाणात सत्तेत भागीदारी नाही. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर हे चित्र बदलणार व ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढाच हक्क दिला जाईल. आदिवासींचे, जल, जंगल, जमीन हक्क अबाधित ठेवणार, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं.

राहुल गांधी यांनी यावेळी आदिवासी व वनवासी यातील फरक समजावून सांगितला. ‘आधार कार्ड योजनेची सुरुवात यूपीए सरकारनं नंदूरबारमधून केली होती, यातून आदिवासींची ओळख स्पष्ट करणारा संदेश दिला होता. देशात आज २२ लोकांकडे जेवढी संपत्ती आहे, तेवढी संपत्ती ७० कोटी लोकसंख्येकडे आहे, ही विषमता आहे,’ याकडं राहुल यांनी लक्ष वेधलं.

राहुल गांधींनी केला आश्वासनांचा वर्षाव

यूपीए सरकारनं आणलेला जमीन अधिग्रहण कायदा भाजप सरकारनं कमकुवत केला आहे, सत्तेत आल्यास पुन्हा हा कायदा मजबूत केला जाईल. जातनिहाय जनगणना केली जाईल, शेतमालाला एमएसपीचा कायदा लागू करणार, ज्या भागात आदिवासींची ५० टक्के लोकसंख्या आहे, तिथं सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आदिवासींना दिला जाईल, ६ व्या शेड्युलमध्ये त्याचा समावेश केला जाईल, असा शब्दही राहुल गांधी यांनी यावेळी दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांचीही यावेळी भाषणं झाली. 

IPL_Entry_Point