राज्य सरकारने आज विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याबाबतचे विधेयक मांडले. यानंतर या विधेयकाला सर्वपक्षीय आमदारांनी एकमताने संमती दिल्याने हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले आहे.यानंतर सत्ताधारी आमदार, नेत्यांकडून आपापल्या मतदारसंघात याचा जल्लोष केला जात आहे. विशेष अधिवेशनात राज्यपालांनी अभिभाषण केल्यानंतर अधिवेशनात प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधेयक सादर केलं. ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहे.
दरम्यान,यानंतर शिंदे गटाचे नेते भरतशेठ गोगवले यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये आरक्षण दिल्ल्याबद्दल कशाप्रकारे आनंदोत्सव साजरा करायचा याच्या सूचना ते कार्यकर्त्यांना देतअसल्याचे दिसतआहेत.
शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले फोनवर म्हणाले, की १०-१० हजाराच्या दोन फटाक्याच्या माळा लावल्या पाहिजे. फटाक्यांच्या आवाजाने उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या बसल्या पाहिजेत. या माळांमध्ये सुतळी बॉम्ब लाव. सर्वांना फोन करुन सर्व मराठ्यांना बोलावून घ्या. खरे मराठे असेल तर तिथे जमा व्हा,असं त्यांना आवाहन करा. जो मराठा नसेल तो येणार नाही, असं सांगा. सर्व कार्यकर्त्यांना बोलावून जंगी सेलिब्रेशन झालं पाहिजे. आपले सर्व पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक सर्व तिथं हजर पाहिजेत. पेढे वाटा. तुमच्या आनंदोत्सवाचे फोटो इकडे यायला पाहिजे, महाड विधानसभा मतदारसंघात कसा जल्लोश झाला आहे, हे साहेबांना दाखवायचं आहे.
विधीमंडळात आज मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले असून विधानपरिषदेत सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर याचे कायद्यात रुंपातर होणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मांडले व सर्वसंमतीने हे मंजूर करण्यात आले.
संबंधित बातम्या